राज्यस्तरीय वरिष्ठ गट व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी पुरुष व महिला संघाची निवड

61

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १२ डिसेंबर २०२२ : ऑलम्पिक असोसिएशन संलग्नित महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन द्वारा आयोजित 53 वी राज्यस्तरीय वरिष्ठ गट पुरुष व महिला व्हॉलीबॉल स्पर्धा वरोरा (जि. चंद्रपूर) येथे 15 ते 18 डिसेंबर 2022 या कालावधीत आयोजित केलेल्या आहेत. सदर स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याचे पुरुष व महिला संघ सहभागी होणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्याचे पुरुष व महिला संघ निवडण्यासाठी 11 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता एम. जे. एफ व्हॉलीबॉल क्लब आष्टी (जि. गडचिरोली) येथील मैदानावर एक दिवसीय निवड चाचणी सामने घेण्यात आले होते..यात पुरुष व महिला संघाची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व गडचिरोली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव सतीश पवार, एम. जे. एफ.क्लब आष्टीचे मार्गदर्शक अमीत शेंडे, अध्यक्ष अनिल पोरेड्डीवार, उपाध्यक्ष महेश राऊत, कोषाध्यक्ष रवी नंदनपवार, सदस्य नितीन जेंगठे यांनी अभिनंदन केले आणि होणाऱ्या स्पर्धेसाठी दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या आहेत.