भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीत उद्या विविध कार्यक्रम

64

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १२ डिसेंबर २०२२ : भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या, १३ डिसेंबर रोजी गडचिरोली शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

मंगळवारी सकाळी ११ वाजता महिला व बाळ रुग्णालय गडचिरोली येथे फळवाटप व वृक्षारोपण कार्यक्रम, दुपारी १२.३० वाजता शासकीय विश्रामगृह इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे अभिष्टचिंतन सोहळा, दुपारी २.३० वाजता सावित्रीबाई फुले नगर परिषद प्राथमिक शाळा गोकुळनगर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांना जास्तीत जास्त संख्येनें उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.