खासदार अशोकजी नेते यांनी हिवाळी अधिवेशनात केली मेडिकल कॉलेजची मागणी

54

– गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्याच्या प्रश्नाकडे वेधले लक्ष्य

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १२ डिसेंबर २०२२  गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी दिल्ली येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संसदेत ३७७ नियम अन्वये गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्याच्या प्रश्नाकडे लक्ष्य वेधले. या जिल्ह्यात आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करून चांगली सेवा मिळावी. यासाठी गडचिरोली येथे मेडिकल कॉलेज आवश्यकता असल्याने ही मागणी मंजूर करावी, अशी विनंती केली.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात आरोग्याच्या दृष्टिकोनातून तळागाळापर्यंत सामान्य नागरिकांना आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मेडिकल कॉलेजची आवश्यक असल्याने दिल्लीत सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये खासदार नेते यांनी लक्ष वेधले. अतिशय मागासलेला व आदिवासीबहुल म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्र हा सर्वात लांब दुर्गम भाग आहे. या भागात आरोग्य सेवेचा अभाव आहे.
यापूर्वीही आपण गडचिरोलीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची मागणी सभागृहात केली होती आणि राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यावर केंद्र निश्चितपणे मान्यता देईल, असे आश्वासनही दिले होते. गडचिरोली येथे नविन वैद्यकिय महाविद्यालय स्थापीत करण्याकरीता मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणविस हे ११ जुलै २०२२ रोजी पुरपरीस्थितीचा आढावा घेण्याकरीता गडचिरोली येथे आले असता, त्यांनी गडचिरोली जिल्ह्याकरीता शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाची घोषणा केलेली आहे. परंतु राज्य सरकारकडून प्रस्ताव अद्याप प्राप्त न झाल्याने त्यात नाहक विलंब होत आहे. त्याकरिता दिल्ली च्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये ३७७ नियम अन्वये संसद भवनात गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय निर्मिती करण्यासंबंधी खासदार अशोकजी नेते यांनी मागणी केली.