विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, १२ डिसेंबर २०२२ : महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar) आज, १२ डिसेंबर रोजी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येेेत आहेत.
या दौऱ्यात ते सकाळी ८.३० वाजता कमलाई निवास, रामदास पेठ, नागपूर येथून ब्रम्हपुरी जि. चंद्रपूरकडे प्रयाण. सकाळी १० वाजता पोदार इंटरनॅशनल स्कूल ब्रम्हपुरी येथे आगमन व वाढदिवसानिमित्त शाळा व्यवस्थापनाद्वारे आयोजित फळवाटप कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी १०.४५ वाजता पोदार इंटरनॅशनल स्कूल येथून ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरीकडे प्रयाण. सकाळी ११ वाजता ब्रह्मपुरी येथे आगमन व तालुका काँग्रेस कमेटी ब्रह्मपुरी द्वारा वाढदिवसाप्रित्यर्थ ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास उपस्थिती. सकाळी ११.४५ वाजता ब्रह्मपुरी येथून वडसा जि. गडचिरोलीकडे प्रयाण. दुपारी १२ वाजता वडसा येथे आगमन व तालुका काँग्रेस कमेटी वडसा जिल्हा गडचिरोली द्वारा वाढदिवसाप्रित्यर्थ माता वार्ड वडसा, जिल्हा गडचिरोली येथे आयोजित भव्य बाईक रॅली, रक्तदान व आरोग्य शिबिरास उपस्थिती. दुपारी १ वाजता वडसा जि. गडचिरोली येथून सिंदेवाही जि. चंद्रपूरकडे प्रयाण. दुपारी २ वाजता सिंदेवाही येथे आगमन व तालुका काँग्रेस कमेटी सिंदेवाही द्वारा वाढदिवसानिमित्त तालुका काँग्रेस जनसंपर्क कार्यालय, नवीन बसस्थानकाजवळ सिंदेवाही जि. चंद्रपूर येेथे आयोजित रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरास उपस्थिती. दुपारी ३ वाजता देवयानी इंटरनॅशनल स्कूल शाळा व्यवस्थापनाद्वारे वाढदिवसाप्रित्यर्थ देवयानी इंटरनॅशनल स्कूल, मुल रोड, सिंदेवाडी जि. चंद्रपूर येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळा तथा वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी ३.३० वाजता सिंदेवाही येथून सावली जि. चंद्रपूरकडे प्रयाण. दुपारी ४ वाजता सावली येथे आगमन व तालुका काँग्रेस कमिटी सावलीद्वारा वाढदिवसानिमित्त जुनी नगरपंचायत गुजरी चौक, सावली जि. चंद्रपूर येथे आयोजित रुग्णांना फळवाटप, महा रक्तदान शिबिर व विविध स्पर्धा कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी ५.३० वाजता सावली जि. चंद्रपूर येथून नागपुरकडे प्रयाण. रात्रौ ७.३० वाजता कमलाई निवास रामदास पेठ नागपुर येथे आगमन व मुक्काम करतील.