माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त सावली तालुका काँग्रेस तर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन

77

विदर्भ क्रांती न्यूज

सावली, १२ डिसेंबर २०२२ : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व आमदार श्री. विजयभाऊ वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांच्या वाढदिवसानिमित्त सावली तालुका काँग्रेस (congress) कमिटीतर्फे आज, १२ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामीण रुग्णालय सावली येथे सोमवारी सकाळी १०.१५ वाजता फळवाटप, कृषी उत्त्पन्न बाजार समिती सावली येथे सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर, जुनी नगरपंचायत, गुजरी चौक सावली येेथे संध्याकाळी ६ वाजता एकलनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धांमध्ये सावली तालुक्यातील बहुसंख्य स्पर्धकांनी भाग घ्यावे व कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.