विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, १० डिसेंबर २०२२ : मागील दोन दिवसापूर्वी भंडारा (bhandara) जिल्ह्यात वावरत असलेला हतींचा (elefant) कळप पुन्हा वडसा wadsa (देसाईगंज) तालुक्यात दाखल झाला असून या कळपाने काही शेतकऱ्यांचे (farmar) नुकसान केल्याची माहिती आहे. त्यामुळे परत वन विभागाची चांगलीच दमछाक होत आहे. भंडारा जिल्ह्यातून प्रवास (journey) करीत हतींचा कळप वडसा (देसाईगंज) दाखल झाला आहे. या कळपाने वडसा तालुक्यातील काही शेतकऱ्यांचे नुकसान केल्याची माहिती आहे. यापूर्वी सुद्धा हतींच्या कळपाने जिल्ह्यात प्रवेश करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. आता परत या हतींच्या कळपाने जिल्ह्यात प्रवेश केल्याने वन विभागाची चिंता वाढल्याचे दिसून येत आहे.