राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यात हिरहिरिने सहभाग घ्या

300

– राकाँचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांचे आवाहन

– अधिवेशनात19 डिसेंबरला राकाँचा भव्य मोर्चा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ७ डिसेंबर २०२२ : राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे प्रत्येक उपक्रम नागरिकांच्या हिताचे असून पक्षाच्या कार्यात पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी हिरहिरिने सहभाग घ्यावे आणि नागपुरातील हिवाळी अधिवेशनात येत्या, 19 डिसेंबर रोजी मोठ्या संख्येने पक्षाच्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांनी केले.
ते 5 डिसेंबर रोजी स्थानिक राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातील प्रांगनात ‘वेध भविष्याचा-विचार राष्ट्रवादीचा’ उपक्रमात व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत अध्यक्षीय स्थानावरुन बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथि म्हणून राज्याचे माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी जि. प. अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, राष्ट्रवाद महिला काँग्रेसचे नागपूर विभागीय अध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, जिल्हाध्यक्ष रविन्द्र वासेकर, नाना नाकाडे माजी सभापती जि .प., युवक जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, शहर अध्यक्ष विजय गोरडवार, वियार्थी अध्यक्ष चेतन पेंदाम, प्रदेश संघटन सचिव युनुस शेख, तालुकाध्यक्ष विवेक बाबनवाडे, अहेरी तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, धानोरा तालुकाध्यक्ष सोपानदेव म्हशाखेत्री, शहराध्यक्ष लतीफ शेख वडसा, शहराध्यक्षा अमीन लालानी, जिल्हा सचिव संजय कोचे, सेवादल अध्यक्ष अमर खंडारे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष इंद्रपाल गेडाम, महिला शहर अध्यक्ष मिनल चिमुरकर, शहर कार्याध्यक्ष कपील बागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय स्थानावरुन पुढे बोलताना, राकाँचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शोषित, पीड़ित, वंचित घटकाच्या न्याय हक्कासाठी झटणारा पक्ष असून शेतकरी, कष्टकरी, वाढती महागाई, खाजगीकरणाच्या विरोधात उठून पेटन्यासाठी आणि महाराष्ट्र शासनापर्यंत आवाज बुलंद करण्यासाठी येत्या, 19 डिसेंबर रोजी पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या खंबिर नेतृत्वाखाली ऐतिहासिक व भव्य मोर्चा काढण्यात येणार असून मोर्चात अधिक संख्येने नागरिक सामील होण्याचे आवाहन करून नरहरी झिरवाळ यांनी राज्याचे व देशाचे अन्यायकारक धोरण रोखणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.
याचवेळी ‘वेध भविष्याचा-विचार राष्ट्रवादीचा’ या अभिनव उपक्रमावरही प्रकाश टाकण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविन्द्र वासेकर यांनी केले तर संचालन सुरेंद्र अलोणे यांनी केले. उपस्थितांचे आभार लीलाधर भरडकर यांनी मानले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अल्पसंख्याक डॉ. एस. एन. पठाण, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल नंदनवार, गुलाम शेख, रायुकाँ उपाध्यक्ष प्रसाद पवार, रायुकाँ शहर अध्यक्ष अमोल कुळमेथे, रायुकाँ जिल्हा संघटक रंजीत रामटेके, कार्याध्यक्ष हिमांशू खरवडे, रायुकाँ जिल्हा सचिव संजय शिंगाडे, अ.भा.वि.प. कुणाल कोवे, विलास ठाकरे, रायुकाँ जिल्हा सचिव आकाश पगाडे, संकेत जनगणवार, मखमुर हुसेन शेख, राविकाँ.उपाध्यक्ष सुमित मोतकुरवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, रायुकाँ तालुका अध्यक्ष स्वप्नील श्रीरामवार अहेरी, मोरेश्वर वासेकर, संजय बोदलकर, विद्यार्थी शहर अध्यक्ष रितीक डोंगरे, संजय अलोने, श्रीनिवास मलेलवार, सा. न्या.विभाग सचिव संघटक हंसराज लांडगे, माजी रायुकाँ जिल्हाध्यक्ष कीशोर तलमले, महेश टिपले, रायुकाँ विधानसभा अध्यक्ष रुपेश वलके, मिथुन नैताम, घनश्याम नैताम, संजय बोदलकर, जितु चलाख, कीशोर कापकर, दत्तु सोनटक्के, हेमंत भाकरे, बंडू मेश्राम, नितीन कारेकार, रामदास रामटेके, अभय इंदूरकर, माजी जि. प. सदस्या ग्यानकुमारी कौशी, सुवर्णा प्रसाद पवार, सविता गौतम चव्हाण, लता शेंद्रे, सा.न्या.विभाग अध्यक्षा प्रमिला रामटेके, छाया निमरड, तालुका अध्यक्षा निता सुरेश बोबाटे, शहर अध्यक्ष अमीन लालानी आरमोरी, शहर कोषाध्यक्ष प्रदीप हजारे, शहर अध्यक्ष लतीफ शेख वडसा, सेवादल प्रदेश संघटण सचिव बुधाजी सिडाम, सेवादल शहर अध्यक्ष मलय्या कालवा, तालुका सरचिटणीस धुरंघर सातपुते, खेमचंद हस्ते, सामा. न्यायविभाग अध्यक्ष देवानंद ईश्वर बोरकर आरमोरी, जिल्हा सरचिटणीस जगन जांभुळकर, तालुका अध्यक्ष क्षितीज उके वडसा, तालुका उपाध्यक्ष रोशन शेंडे वडसा, मानीक मेश्राम व सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.