– समाज प्रबोधन व किर्तन कार्यक्रम
विदर्भ क्रांती न्यूज
चामोर्शी, ७ डिसेंबर २०२२ : तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री जगनाडे महाराज यांची जयंती कार्यक्रम 8 डिसेंबर 2022 रोजी बाजार चौक चामोर्शी येथे आयोजित केला आहे. या जयंती उत्सवासाठी चामोर्शी शहरवासीय तसेच तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी या समाज प्रबोधन व कीर्तन कार्यक्रमाला तसेच सत्कार कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संताजी स्नेही मंडळ चामोर्शीच्या वतीने करण्यात आलेले आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक, संत वाङमय अभ्यासक संजय येरणे नागभीड, तर प्रमुख वक्ते सेवानिवृत्त प्राध्यापक रमेश पिसे, कीर्तनकार सप्तखंजिरी वादक बाल समाज प्रबोधनकार कुमारी भाविका खंडाळकर नागपूर हे या कार्यक्रमाला मार्गदर्शन करणार आहेत. तसेच तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीचे गुणवंत विद्यार्थी आणि नव्यानेच स्पर्धा परीक्षाच्या माध्यमाने निवड झालेल्या कर्मचाऱ्यांनी सत्कारासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संताजी स्नेही मंडळ चामोर्शी यांनी केले आहे.