खरपुंडी येथे ‘डंख सुवासिनीचा’ नाटकाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते उद्घाटन

52

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ६ डिसेंबर २०२२ : गड़चिरोली तालुक्यातील खरपुंडी येथे नवयुवक नाट्य कला मंडळ यांच्या सौजन्याने ‘डंख सुवासिनीचा’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. वर्षभर बळीराजा शेतात राबतो शेतीची मळनी होताच ग्रमीण भागात जनतेच्या मनोरंजनासाठी संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यांच्याच एक भाग म्हणून रविवारी खास मंडईनिमित्त खरपुंडी येथे नवयुवक नाट्य कला मंडळ यांच्या सौजन्याने ‘डंख सुवासिनीचा’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचे उद्धघाटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख श्री. अरविंदभाऊ कात्रटवार हे होते. याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणुन लाभलेले संजय बोबाटे, कुणाल पेंदोरकर, विक्की भुरसे, दिनेश समर्थ, बालुभाऊ मेश्राम, उन्दिरवाड़े, शेंडे, कालिदास राऊत, तसेच नवयुवक नाट्य कला मंडळचे सदस्य रोहिदास दुभाने, कमलाकर नैताम, मोहन चलाख, उमाजी गुरनुले, राहुल भोयर, उमाजी कातकर, पंकज जुवारे, विकास जुवारे, हेमंत चलाख, गुरुदेव सहारे, अरुण टिकले, वाल्मीक वासेकर, संदीप निकोडे यांच्यासह खरपुंडी येथील गवकारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.