विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, ६ डिसेंबर २०२२ : गड़चिरोली तालुक्यातील धुंडेशिवनी येथे सर्वमित्र नाट्यकला मंडळ यांच्या सौजन्याने “तूच माझी सौभाग्यवती” या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. वर्षभर बळीराजा शेतात राबतो शेतीची मळनी होताच ग्रमीण भागात जनतेच्या मनोरंजनासाठी संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यांचाच एक भाग म्हणून खास मंडई निमित्त धुंडेशिवनी येथे सर्वमित्र नाट्य कला मंडळ यांच्या सौजन्याने “तूच माझी सौभाग्यवती” या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचे उद्धघाटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख श्री. अरविंदभाऊ कात्रटवार हे होते. याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुने म्हणून लाभलेले यादवजी लोहबरे, दौलत घोडाम, संदीप भुरसे, अनंता ठाकरे, विनायक निकुरे, अशोक मुळे, दिलीप चनेकार, बालाजी गेडाम, एकनाथ फुलझले, देवीदास जाभुलकर, माधव मडावी, श्रीकांत डोमदे, तसेच सर्वमित्र नाट्य कला मंडळचे सदस्य पंढरी निकुरे, छत्रपती चुदरी, त्र्यम्बक फुलझेले, किशोर रंधये, चरण गेडाम, दीपक उन्दिरवाड़े, योगाजी गेडाम, पंकज राउत, आदेश डोमले, रवि चुदरी, नीलेश चुधरी, योगजी मडावी यांच्यासह धुंडेशिवनी येथील गवकारी मंडळी मोठ्या संख्याने उपस्थित होते.