जलकुंभ भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटन खासदार अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात संपन्न

59

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जल जीवन मिशन पेयजल कार्यक्रम अंतर्गत गडचिरोली तालुक्यातील मुरखडा (नवेगाव) येथे  खासदार अशोकजी नेते गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्र तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु जनजाती मोर्चा यांच्या हस्ते जलकुंभाचे भूमिपूजन करण्यात आले. या सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना खा. नेते म्हणालेे, ग्रामीण भागातील नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले पाहिजे. कोणत्याही नागरिकाला पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येवू नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजनबद्ध पद्धतीने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लवकरात लवकर जलकुंभ उभारावे, असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी केले.

याप्रसंगी आमदार डॉ. देवराव होळी, सरपंच दशरथ चांदेकर, माजी सभापती मारोतराव ईचोडकर, माजी उपसभापती विलास दशमुखे, कार्यकारी अभियंता अमित तुरकर, उप. वि. अभियंता अनिल कोटनाके, उपसरपंच राजेंद्र खंगार, ग.वि.अ. साळवे, ग्रामविकास अधिकारी मोगरकर, कंत्राटदार रितेश गडपल्लीवार, नंदुजी पा. मांदाळे माजी सरपंच, प्रकाश मुद्दमवार बांधकाम सभापती, कीर्तीकुमार मासुरकर माजी ग्रा. पं. सदस्य, से. नि. उपनिरिक्षक लोहबरे, माजी उपसरपंच उर्मिलाताई चौधरी, ग्रापं. सदस्या मुरखडा (नवेगांव) पुष्पाताई उमरे, स्वाती राऊत, रेखाताई डोनाडकर, शुभांगीताई मोहुरले, शैला कोकोडे, सुप्रिया गायकवाड, तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.