ग्रंथ संपदा जोपासणे ही काळाची गरज : आमदार डॉ. देवरावजी होळी

79

– महिला महाविद्यालय गडचिरोली येथे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते ग्रंथालयाचे उद्घाटन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : ग्रंथ संपदा जोपासणे ही;आजच्या काळाची नितांत गरज असून त्याचा वाचकांना यथायोग्य लाभ मिळावा याची काळजी घेण्याची जबाबदारी ग्रंथालयाने घ्यावी, असे प्रतिपादन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी महिला महाविद्यालय गडचिरोली येथील  ग्रंथालयाचे उद्घाटनप्रसंगी केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. खंगार, सिनेट मेंबर डॉ. विवेक गोर्लावर आणि डॉ. रूपेंद्र गौर, ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. वर्षा तिडके, प्रा. गहाणे, प्रा. लाकडे, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथालयीन कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

*आधुनिक काळात मोबाईलचे वेड लोकांना लागलेले असून त्यातूनच अधिकाधिक माहिती घेण्याचा प्रयत्न वाचकांचा असतो. परंतू ग्रंथसंपदे इतकी माहिती त्यातून मिळत नाही. त्यामुळे ही ग्रंथसंपदा जोपासून ठेवणे ही आजच्या काळाची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले*