प्रभाग क्र. ११ मधील शेकडो नागरिकांची नगर परिषदेवर धडक

70

– वार्डातील समस्या तात्काळ सोडवा ; युवक काँग्रेसचे सहसचिव कुणाल पेंदोरकर यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी यांना निवेदन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शहरातील चंद्रपुर मार्गावरील प्रभाग क्र. ११ मध्ये विविध समस्या निर्माण झाल्या असून वार्डातील नागरिकांना अनेक अडचनीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या भागातील अंडरग्राऊंड नाला बांधकाम तसेच रस्ते, नाल्यांचे बांधकाम करून नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावे, या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी वार्डातील नागरिकांना नगर पालिकेवर धडक देऊन मुख्याधिकारी यांचे समस्यांकडे लक्ष वेधले.

प्रभाग क्र. ११ मध्ये विविध समस्या असून समस्या सोडविण्याकडे नगरपालिका प्रशासन व या भागातील नगरसेवकांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. शहरातील सांडपाणी नाल्याद्वारे रेव्हनी कॉलनी, गणेशनगरात पसरते. त्यामुळे या भागात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नाल्याचे अंडरग्राऊंड बांधकाम करावे. प्रभाग क्र. ११ मध्ये अद्यापही अनेक भागात पक्के रस्ते व नाल्या बांधण्यात आलेल्या नाही. त्यामुळे पावसाळयात सर्वत्र पाण्याचे डबके निर्माण होऊन परिसर जलमय होते. त्यामुळे आवागमन करतांना या भागातील छोटी बालके, शाळेकरी मुले व नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. रेव्हन्यू कॉलनी, गणेश नगर, पंचवटी नगर, सोनापूर कॉम्प्लेक्स मधील अंतर्गत रस्ते अजूनही झाले नाही. प्रभागातील नागरिक मागील 20 वर्षेपासून रहिवासी असून सुद्धा रस्ते, नाली, नाली, पाण्याचे नळ, या सर्व सुविधे पासून वंचित आहेत. मुख्य मार्गावरून कोर्ट कॉलनी तसेच महिला महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रोडचे मजबुतीकरण करून देण्यात यावे. प्रभागातील ओपन प्लेस चे सौंदर्यीकरण करून देण्यात यावे. प्रभागात वाढीव नळ लाईन आणि गटार लाईनचे वाढीव मंजुरी देण्यात यावी. नगर पालिका प्रशासनाला विविध योजनांमधून निधी उपलब्ध होऊही प्रभाग क्र. 11 च्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. नागरिकांच्या अडचनी लक्षात घेता या भागातील समस्या तातडीने सोडवून विकासाला चालणा द्यावी, अशी मागणी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सहसचिव कुणाल पेंदोरकर यांनी यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली. मुख्याधिकारी यांनी वार्डातील नागरिकांसोबत चर्चा करून समस्या पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांना आदेश देऊन सर्व समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन नागरिकांना दिले.

यावेळी कुणाल पेंदोरकर, प्रफुल बिजवे, अनिल जैन, दिलीप अडेट्टीवार, परशुराम वाढणकर, शामराव सिल्लमवार, विश्वनाथ तलांडे, दुधराम रोहणकर, भाऊराव भोयर, मनोज इरकुलवार, साई सिल्लमवार, शरद गिरेपुंजे, स्वप्नील अडेट्टीवार, अभि उमाटे, शुभम रोहणकर, अमित तलांडे, अरुण पुण्यप्रेड्डीवार, सुभाष धाईत, दामोदर उप्परवार, आनंद गडप्पा, अजित बोरकर, वैभव भोयर, प्रेमानंद नंदेश्वर, सीताराम आतला, भुपेंद्र मंदिरकर, आशिष शिडाम, महाजन साहेब, पुष्पलता कुमरे, उमाताई देवईकर, रेवती गोरले, रितू जैन,वनिता सेलोटे, निर्मला वाढणकर, सोनाली बीजवे, रजनी गेडाम, सुशीला डोंगरे, रेखा अडेट्टीवार, अनिता ठाकरे, शामन चाचेरे, गुडडी भुर्रे, प्रीती शिडाम, मनीषा ढवळे, सपना दत्ता, लता नैताम, कविता होळी, वैशु इरकूलवार, बोरकर काकू, गनीता वरखडे, वर्षा भोयर,, मंजुषा खरवडे, रश्मी केदार यांचेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.