तळागाळातील गोरगरिबांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महिला आघाडीने पुढाकार घ्यावा

48

– महिला आघाडीच्या प्रदेश सदस्या रेखाताई डोळस यांचे महिलांना आवाहन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली सारख्या अतिदुर्गम, नक्षलग्रस्त, आदिवासी भागात संपूर्ण बाराही तालुक्यात मोठ्या प्रमानावर भारतीय जनता पक्षाचे महिला पदाधिकारी
गडचिरोली जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून भारतीय जनता पक्षाचा काम करीत आहेत भारतीय जनता पार्टीचे काम हाताळण्यात व शासनाची विबिध विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील महिलांचा मोलाचा वाटा असून याच आमच्या भगिनी जिल्ह्यातील सर्व दूर केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष महिलांना, शेवटच्या नागरिकांना मिळतो की नाही याची माहिती पोहोचवून त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून देणे गरजेचे आहे व गडचिरोली सारख्या आदिवासी भागातील महिला आपली घरातील, शेतीची कामे करून भारतीय जनता पार्टीसाठी वेळ देऊन पार्टीचे काम समोर वाढवित आहेत हे त्यांचे काम कौतुकास्पद आहे. यापुढेही महिलांनी केंद्र व राज्य शासनाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय तसेच विविध योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची माहिती घेऊन व विचारपूस करून तशी माहिती पाठवावी व तसेच शेवटच्या घटकाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळाले की नाही, त्यांना योजनेचा लाभ कसा मिळवून* *देता येईल यासाठी प्रयत्न करावे व स्वतः पुढाकार घ्यावा भारतीय जनता पार्टीचे महिलांचे संघटन जिल्ह्यात वाढविण्यासाठी परिश्रम घ्यावा व गेल्या अनेक वर्षांपासून मी गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अविरत पक्ष संघटनेचा काम करीत आहे. महिलांना काम करतांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असतो. परंतु पक्षासाठी सुद्धा देणे गरजेचे आहे व गडचिरोली जिल्ह्यातील महिलांंनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या योजना पोहचवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्या रेखाताई डोळस यांनी केले.
याप्रसंगी भाजपचे महिला मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष माननीय चित्राताई वाघ यांचे गडचिरोली जिल्हा महिला आघाडीच्या वतीने व संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने मोठे पुष्पहार घालून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगीताताई भांडेकर यांच्या हस्ते मा. चित्राताई वाघ यांचा शाल श्रीफळ, बांबू हस्तकलेचे शिल्ड मोमेंटो व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच गडचिरोलो शहराच्या माजी नगराध्यक्ष व भाजप महिला आघाडी ओबीसी मोर्चाच्या जिल्हा संयोजिका माननीय योगिताताई पिपरे यांच्या हस्ते चित्राताई वाघ यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जंगी सत्कार करण्यात आला.
यावेळी गडचिरोली तालुका, शहर यासह आरमोरी, वडसा कुरखेडा, कोरची चामोर्शी, धानोरा येथील महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.