आदिवासी बांधवांनी भगवान बिरसा मुंडा यांचा जीवनातून प्रेरणा घ्यावा : खासदार अशोकभाऊ नेते

72

– आलापल्ली , मुरूमगाव, बोरी येथील भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदिवासी समाजाचे जननायक, क्रांतीसुर्य, वीर शहीद, भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनाचा प्रेरणा आदिवासीं बांधवांनी घ्यावा, असे प्रतिपादन गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकभाऊ नेते यांनी केले. अहेरी तालुक्यातील आलापल्ली, धानोरा तालुक्यातील मुरूमगाव, चामोर्शी तालुक्यातील बोरी येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत विविध कार्यक्रमांंमध्ये केले.
यावेळी प्रामुख्याने माजी पालकमंत्री राजे अंबरीशराव महाराज आत्राम, युवा नेते अवधेशराव महाराज आत्राम, स्वप्नीलभाऊ वरघंटे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. तामदेव दुधबळे, महिला आघाडी प्रदेश सदस्या रेखाताई डोळस यांचेसह आदिवासी समाज बांधव व भगिनी मोठया संख्येने आज उपस्थित होते.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त खासदार अशोकभाऊ नेते यांनी सकाळपासूनच गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली, धानोरा तालुक्यातील मुरूमगाव, चामोर्शी तालुक्यातील बोरो तथा अनेक गावांत जाऊन भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला व पुतळ्यांना पुष्पार्पण करून अभिवादन करून हजारो उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले व सांगितले.
थोर स्वतंत्रता सेनानी असलेले भगवान बिरसा मुंडा हे इंग्रजांच्या विरोधात प्रखर लढा देणारे आदिवासी समाजाचे सच्चे जननायक आहेत. त्यांनी आदिवासी समाजला इंग्रजां विरुद्ध प्रोत्साहित केले. त्यांचे संपूर्ण जीवन हे इंग्रजांच्या प्रस्थापित राजवटी विरोधात होते. त्यांनी आपल्या देशासाठी व आपल्या समाज बांधवांसाठी इंग्रजांच्या विरोधात दिलेला लढा हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी केलेली आदिवासी समाजातील चळवळ ही सर्वांसाठी आदर्श व प्रेरणा घेणारी आहे. त्यांच्या कार्याची कितीही महती गायली तरी ती कमीच पडणार आहे. त्यांच्या जीवनातील थोडासा अंश जरी आपण अंगीकारला तरी आपण आपल्या जीवनाचे सार्थक नक्कीच करू, असे प्रतिपादन खासदार अशोकभाऊ नेते यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित येथील विविध गावातील कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने केले.