मून दाम्पत्याकडून चि. विकल्प मून तर्फे गोंडवाना सैनिक विद्यालयास दिली विशेष भेटवस्तू

38

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मून दाम्पत्याकडून चि. विकल्प मून तर्फे गोंडवाना सैनिक विद्यालयास विशेष भेटवस्तू देण्यात आली. गोंडवाना सैनिक विद्यालय येथील रहिवाशी विध्यार्थी वर्गाच्या आरोग्याच्या दृष्टीने आजारपणाच्या काळात सर्व विद्यार्थी वर्गाला निर्जंतुक गरम पाण्याची उपलब्धता व्हावी म्हणूूून मून कुटुंबाकडून पिण्याचे पाणी गरम करून निर्जंतुक करणारी प्रेस्टिज कंपनीची दीड लिटर क्षमता असलेली इलेक्ट्रिक केटली गोंडावाना सैनिक विद्यालयाच्या डिस्पेन्सरी कक्षाला भेट देण्यात आली.

याप्रसंगी गोंडवाना सैनिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. संजीव गोसावी, पर्यवेक्षक श्री. अजय वानखेडे, डिस्पेन्सरीचे ब्रदर श्री. स्वप्नील वंजारी, श्री. विवेक मून, सौ. ग्रीष्मा मून, चि. विकल्प मून तसेच विद्यार्थी मित्र प्रामुख्याने उपस्थित होते.