शासनाच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटकांना मिळवून द्या : चित्राताई वाघ

133

– भाजपच्या जिल्हा महिला मेळाव्याला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली सारख्या अतिदुर्गम, नक्षलग्रस्त आदिवासी भागातून बाराही तालुक्यातून मोठ्या प्रमानावर महिला जिल्हा मेळाव्यासाठी आल्या याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. खऱ्याअर्थाने भारतीय जनता पार्टीचे काम हाताळण्यात व शासनाची विबिध विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या दुर्गम भागातील महिलांचा मोलाचा वाटा असून याच आमच्या भगिनी जिल्ह्यातील सर्व दूर केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष महिलांना, शेवटच्या नागरिकांना मिळतो की नाही याची माहिती पोहोचवून त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून देतात त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. गडचिरोली सारख्या आदिवासी भागातील महिला आपली घरातील, शेतीची कामे करून भारतीय जनता पार्टीसाठी वेळ देऊन पार्टीचे काम समोर वाढवित आहेत हे त्यांचे काम कौतुकास्पद आहे. यापुढेही महिलांनी केंद्र व राज्य शासनाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय तसेच विविध योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची माहिती घेऊन व विचारपूस करून तशी माहिती प्रदेश कार्यालयाला पाठवावी व तसेच शेवटच्या घटकाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळाले की नाही, त्यांना योजनेचा लाभ कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करावे व भारतीय जनता पार्टीचे महिलांचे संघटन जिल्ह्यात वाढविण्यासाठी परिश्रम घ्यावा, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केले.

याप्रसंगी भाजपचे महिला मोर्चाचे प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ यांचे गडचिरोली जिल्हा महिला आघाडीच्या वतीने व सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने मोठे पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगीताताई भांडेकर यांच्या हस्ते मा. चित्राताई वाघ यांचा शाल श्रीफळ , बांबू हस्तकलेचे शिल्ड मोमेंटो व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गडचिरोलो शहराच्या माजी नगराध्यक्ष व भाजप महिला आघाडी ओबीसी मोर्चाच्या जिल्हा संयोजिका योगिताताई पिपरे यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी गडचिरोली तालुका, शहर यासह आरमोरी, वडसा, कुरखेडा, कोरची, चामोर्शी, धानोरा, अहेरी, एटपल्ली, मूलचेरा या सर्व तालुक्याच्या वतीने महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने  14 नोव्हेंबर रोजी आरमोरी मार्गांवरील सुमानंद सभागृहात जिल्हा महिला मेळावा पार पडला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ प्रामुख्याने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष योगीताताई भांडेकर होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्ष तथा भाजपा ओबीसी महिला आघाडीच्या जिल्हा संयोजिका योगीताताई पिपरे, प्रदेश सदस्य रेखाताई डोळस, महिला आघाडीच्या जिल्हा महामंत्री अर्चनाताई ढोरे, जिल्हा महामंत्री वर्षाताई शेडमाके, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद कुथे, भाजपच्या जिल्हा सचिव गीताताई हिंगे, देसाइगंजच्या माजी नगराध्यक्ष शालुताई दंडवते, भाजयुमो जिल्हा युवती प्रमुखं प्रितीताई शंभरकर, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, गडचिरोली शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा कविताताई उरकुडे उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यक्रमाच्या अध्यक्ष महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगीताताई भांडेकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन पुष्पाताई गझलवार यांनी केले. आभार प्रदर्शन जिल्हा सचिव गीताताई हिंगे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.