– सोमवारी गडचिरोलीत भारतीय जनता महिला मोर्चाच्या वतीने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांच्या उपस्थितीमध्ये १४ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता सुमानंद सभागृहामध्ये भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला गडचिरोली जिल्ह्यातून महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले आहे.
भारतीय जनता पार्टीच्या जेष्ठ नेत्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ या संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास करीत आहेत. आपल्या गडचिरोली जिल्ह्यात त्यांचा प्रवास १४ नोव्हेंबर २०२२ रोजी होत असून त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हा महिला मेळावा सुमानंद सभागृह आरमोरी रोड गडचिरोली येथे दुपारी १२ वाजता आयोजीत करण्यात आला आहे. या मेळाव्याला संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातून प्रमुख महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित राहणार आहेत. तरी या मेळाव्याला महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केले आहे.