भाजपा गडचिरोली जिल्हा कोअर कमेटी बैठकीला राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची विशेष उपस्थिती

59

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भाजपाचे विदर्भ संघटन प्रमुख डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांच्या अध्यक्षतेखाली काल गडचिरोली येतील सर्किट हाउस येथे भाजपा गडचिरोली जिल्हा कोअर कमेटीची बैठक भाजपा प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य तथा गडचिरोली जिल्हाचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या विशेष उपस्थितीत पार पडली.
डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांनी ह्यावेळी मार्गदर्शन केले. तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक, धन्यवाद मोदीजी कार्यक्रम सह गडचिरोली जिल्हात भाजपाचे संघटन ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाढविण्यासाठी विविध विषयांवर महत्वपूर्ण चर्चा व निर्णय ह्या बैठकीत घेण्यात आले.
ह्या बैठकीला खासदार अशोकजी नेते, आमदार कृष्णाजी गजबे, भाजपा जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, जेष्ठ नेते बाबुरावजी कोहडे, प्रकाश सावकार पोरेड्डीवार सह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.