14 नोव्हेंबर रोजी भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ महिलांना मार्गदर्शन करणार

95

– भाजपच्या महिला मेळाव्यासाठी गडचिरोलीत नियोजन बैठक

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष माननीय चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनात दिनांक 14 नोव्हेंबर रोजी आरमोरी मार्गावरील सुमानंद सभागृहात भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमाचे नियोजन व पूर्वतयारीसाठी दिनांक 11 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराची महत्वपूर्ण बैठक इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहात पार पडली.
या बैठकीला प्रामुख्याने भाजपचे जिल्हा संघटन महामंत्री रवींद्रजी ओल्लालवार, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, गडचिरोली शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगीताताई भांडेकर, महिला ओबीसी मोर्चाच्या जिल्हा संयोजिका तथा माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, गीताताई हिंगे, महिला आघाडीच्या जिल्हा महामंत्री वर्षाताई शेडमाके, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविताताई उरकुडे, माजी नगरसेविका वैष्णवीताई नैताम, माजी नगरसेविका अलकाताई पोहनकर, माजी नगरसेविका नीताताई उंदीरवाडे, माजी नगरसेविका लताताई लाटकर, भावनाताई हजारे, रश्मीताई बाणमारे, कोमल बारसागडे व गडचिरोली शहर कार्यकारणीच्या महिला पदाधिकारी व सदस्या उपस्थित होत्या.

या बैठकीत 14 नोव्हेंबर २०२२ रोजी आयोजित महिला मेळाव्यासाठी पूर्वतयारी काय काय करायची, कार्यक्रमाचे नियोजन व कोणती जबाबदारी कोणाकडे द्यायची याविषयी सविस्तर मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले. तसेच गडचिरोली शहरातील एकूण 27 वार्डातील महिलांना कार्यक्रमाला आणण्यासाठी जबाबदारी व गाड्यांचे नियोजन करण्यात आले. तसेच प्रत्येक वार्डातील भाजप पदाधिकारी यांना आपापल्या वार्डातून 50 ते 100 महिलांना आणण्याचे ठरविण्यात आले. गडचिरोली शहरातून महिला मेळाव्यासाठी 500 ते 600 महिलांना आणण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले व कार्यक्रमाच्या ठिकाणची व्यवस्था, मंचावरील व्यवस्था सर्व वेळेनुसार नियोजन करण्यात आले व सर्व पदाधिकाऱ्यांना कामाची जबाबदारी देण्यात आली.

भाजपचे प्रदेश अध्यक्ष माननीय चित्राताई वाघ या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या असून त्यांना महिलांच्या सरक्षणांची जाण आहे. त्यांना महिलांच्या प्रगतीसाठी व त्यांच्या उत्थानासाठी काय करता येईल व महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी काय करायचे याविषयीचे सविस्तर मार्गदर्शन त्या करणार आहेत. तरी जिल्ह्यातील व शहरातील महिलांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व मोठया संख्येने महिलांनी मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन गडचिरोली शहर महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.