भाजपच्या प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाचा महिलांंनी लाभ घ्यावा : योगीताताई भांडेकर

50

– चामोर्शी येथे महिला आघाडीची तालुका बैठक

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी येथे भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने तालुक्याची बैठक दिनांक 10 नोव्हेंंबर रोजी पार पडली. महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षा माननीय चित्राताई वाघ यांचा दिनांक 14 नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे दौरा असून त्या दौऱ्या दरम्यान भाजपाचा भव्य महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्या मेळाव्याच्या अनुषंगाने पूर्वतयारीसाठी व जास्तीत जास्त भाजप पदाधिकारी महिलांना कार्यक्रम साठी आणण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये बैठका घेणे सुरू असून 10 नोव्हेंबरला चामोर्शी येथे बैठक पार पडली. या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांना, महिला सदस्यांना मोलाचे मार्गदर्शन करून पक्ष संघटनेसाठी परिश्रम घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच 14 नोव्हेंबर रोजी आयोजित महिला मेळाव्याला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहावे व प्रदेश अध्यक्ष मा चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी इतरही महिलांना मोठया संख्येने आणण्यासाठी पदाधिकाऱ्यांना प्रयत्न करून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगिताताई भांडेकर यांनी केले.

कार्यक्रमाला प्रामुख्याने गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, भावनाताई हजारे, रश्मीताई बानमारे, चामोर्शीच्या महिला तालुकाध्यक्ष माधवीताई पेशट्टीवार, माजी पं. स. उपसभापती आकुलीबाई विश्वास, माजी सरपंच अनिताताई रॉय, माजी पंस उपसभापती वंदनाताई गौरकर, चंद्रकलाताई आत्राम, सोरते तसेच भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.