खा. संजय राऊत यांच्या सुटकेचा गडचिरोली येथील स्थानिक इंदिरा गांधी चौकात शिवसैनिकांकडून जल्लोष

56

– शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केला इडीचा निषेध

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शिवसेनेचे जेष्ठ नेते मा. खा. संजय राऊत साहेब यांना इडीने पत्राचाळ पुर्नविकास गैरव्यवहाराच्या आरोपाखाली केलेली अटक ही बेकायदेशिर असल्याचा निर्वाळा न्यायालयाने देत त्यांना जामिन मंजूर केला. तसेच मा. खा. राऊत साहेब यांच्यावर इडीने केलेल्या कारवाईबाबात न्यायालयाने ताशेरे ओढले. मा. खा. राऊत साहेब यांना न्यायालयाने जामिन मंजूर केल्याने त्यांच्या सुटकेचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार व त्यांच्या शिवसैनिकांनी गडचिरोलीत जल्लोष साजरा केला. मा. खा. संजय राऊत साहेब यांना न्यायालयाने जमिन मंजूर केल्याबाबत शिवसैनिकांनी मा. खा. संजय राऊत तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं, मा. संजय राऊत साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं, मा. राऊत साहेब जिंदाबाद, इडी मुर्दाबाद, जय भवानी जय शिवाजी, इडीचा दुरूपयोग करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो अशा घोषणा दिल्या. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले की, केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने इडीचा दुरूपयोग सुरू केला आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते मा. खा. संजय राऊत साहेब यांना जाणूनबुजन या प्रकरणात गोवून अटक करण्यात आली. मा.खा.राऊत साहेब हे गेल्या तीन महिन्यापासून कारागृहात होते. त्यांनी कधीही हिंमत सोडली नाही. त्यांचा न्यायालयावर विश्वास होता. इडीने पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात विनाकरण गोवले असून त्यांना बेकायदा अटक केल्याचे निरीक्षण पीएमएलए न्यायालयाने नोंदविले आणि जामिन मंजूर केला. न्यायालयाने मा. खा. संजय राऊत साहेब यांच्या बाजुने दिलेला निर्णय हा केंद्र सरकार व इडीला चपराक आहे,असे अरविंद कात्रटवार यावेळी म्हणाले.याप्रसंगी शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार, सह संपर्क प्रमुख विलास कोडापे, उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, नवनाथ ऊके, संदीप अलबनकर, प्रशांत ठाकुर, संदीप भुरसे, संजय बोबाटे, सचिन निलेकर, मुकेश गुरनुले, सूरज उइके, अमित बानबले, आनंदराव चुधरी, दिलीप चनेकर, ईश्वर लाजुरकर, पूंजीराम चुधरी, भगवान चनेकर, राहुल खेवले, तानाबा दजगये, नानाजी काळबंधे, राहुल सोरते, स्वप्निल खांडरे, अंबादास मुनघाते, धनेश्वर सुरकर, धानेश्वर फुकेट, सूरज कोलते, निकेश लोहबरे, सूरज शेंडे, विलास देशमुख, सोनू ठाकरे, रविंद्र मिसार, निरंजन लोहबरे, अरुण बरापात्रे, राजू जवाड़े, दिलीप वलादे, अमित उईके, कवदुजी धन्द्रे, राहुल मड़ावी, गणेश दहलाकर, यादवजी चौधरी, जविन कुरुड़कर, विनोद लेनगुरे, वैभव तिवाड़े, हेमंत चुधरी, सुनील करतेस, पूर्ण उन्दिरवाडे, मोतीराम चंद्रगिरि, समीर शेख, सचिन भुसारी, मुकेश आवारी, मुरारी धोटे, भूषण गुरुकार, चंद्रभान कोमलवार, निकेश मड़ावी, सचिन स्लोटे, मधुकर बावने, गणेश ब्रमनवाड़े, सूरज उइके, दयाराम चापले, रमेश चनेकर, मुकरु चांग, तुलशिराम मेश्राम, नीलकंठ दुमने, अजय कंबड़े, चेतन हजारे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.