चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत गडचिरोलीत आज महिला मेळावा

54

– उपस्थित राहण्याचे भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश सदस्या रेखाताई डोळस यांचे आवाहन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भाजपा महिला मोर्चाच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ 14 नोव्हेंबर रोजी गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्ताने भाजपा महिला गडचिरोली शहर व ग्रामीण यांच्या वतीने सोमवार, 14 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता स्थानिक आरमोरी मार्गावरील सुमानंद सभागृहात भाजपा जिल्हा महिला कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याला खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णाजी गजबे, भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, प्रमोद पिपरे, प्रशांत वाघरे, गोविंद सारडा, एस. टी. मोर्चा प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद कुथे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, एसटी मोर्चाचे संदीप कोरेत,ओबीसी मोर्चाचे सुनील पारधी, अल्पसंख्याक आघाडीचे बबलुभाई हुसेनी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या महिला मेळाव्याला भाजपा महिला वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश सदस्या रेखाताई डोळस, माजी जि. प. अध्यक्ष योगिताताई भांडेकर, गिताताई हिंगे, सुनिता ढोरे, शालुताई दंडवते, प्रीती शंभरकर, संगीताताई रेवतकर, सुनंदा करकाडे, मीनाताई कोडाप, रहिमताई सिद्दिकी, दुर्गमताई, सोनालीताई पिपरे, रुकसाना पठाण, शमा अली, वच्छलाताई मुनघाटे, गीता कुळमेथे, संघमित्रा खोब्रागडे, पल्लवी बारापात्रे आदींनी केले आहे.