रेव्हनी कॉलनी गणेश नगरातील नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले !

85

– सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्याचे अंडरगाऊंड बांधकाम करण्याची मागणी

– कुणाल पेंदोरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली शहरातील चंद्रपूर मार्गावरील रेव्हनी कॉलनी आणि गणेश नगरात सांडपाण्याची समस्या निर्माण झाली असून सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. या भागात सांडपाणी वाहून जाणारा नाला आहे. या नाल्याचे सांडपाणी रेव्हनी कॉलनी आणि गणेश नगरात पसरत असल्याने दुर्गंधी निर्माण होते. त्यामुळे सांडपाणी वाहून सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्याचे अंडरग्राऊंड बांधकाम करावे, या मागणीसाठी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सहसचिव कुणाल पेंदोरकर यांच्या नेतृत्वात नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकारी यांना शेकडो नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन देऊन लक्ष वेधले.

कुणाल पेंदोरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून दिले की, रेव्हनी कॉलनी व गणेश नगरात काही ठिकाणी अद्यापही रस्ते, नाली बांधकाम झालेले नाही. पावसाळयात या भागात तर पुरपरिस्थीती निर्माण होते. चंद्रपूर रोडवर सांडपाणी वाहून जाणारा मोठा नाला आहे. या नाल्यात गोकुळनगर, चनकाईनगरातील सांडपाणी वाहून येते. हे सांडपाणी रेव्हनी कॉलनी व गणेशनगरात पसरते. त्यामुळे सर्वत्र घाण साचून दुर्गधी सुटते. त्यामुळे या वार्डातील नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. नाल्याद्वारे वाहून जाणाऱ्या सांडपाण्याची योग्यरित्या विल्हेवाट लावण्यासाठी नाल्याचे अंडरग्राऊंड बांधकाम करण्याची गरज आहे. त्यामुळे सांडपाण्याचा योग्यरित्या निचरा होऊन दोन्ही भागात सांडपाण्याची निर्माण होणार नाही आणि नागरिकांना सांडपण्याचा त्रास होणार नाही. रेव्हनी कॉलनी आणि गणेश नगरातील नागरिकांच्या आरोग्याची समस्या लक्षात घेता सांडपाणी वाहून जाणारा नाल्याचे अंडरगाउुंड बांधकाम करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाला निर्देश द्यावे, अशी मागणी कुणाल पेंदोरकर व वार्डातील नागरिकांनी जिल्हाधिकारी मिना यांच्याकडे केली. जिल्हाधिकारी मीणा यांनी सदर समस्या तातडीने सोडविण्यासाठी नगरपालिका प्रशासनाला योग्य ते निर्देश दिले जातील, ग्वाही याप्रसंगी दिली.

यावेळी उपस्थित कुणाल पेंदोरकर, प्रफुल बिजवे, अनिल जैन, दिलीप अडेट्टीवार, पुरुषोत्तम वाढणकर, शामराव सिल्लमवार, विश्वनाथ तलांडे, दुधराम रोहणकर, भाऊराव भोयर, मनोज इरकुलवार, साई सिल्लमवार, स्वप्नील अडेट्टीवार, अभि उमाटे, शुभम रोहणकर, अमित तलांडे, अरुण पुण्यप्रेड्डीवार, सुभाष धाईत, दामोदर उप्परवार, आनंद गडप्पा, अजित बोरकर, वैभव भोयर, प्रेमानंद नंदेश्वर, सीताराम आतला, भुपेंद्र मंदिरकर, आशिष शिडाम, महाजन साहेब, पुष्पलता कुमरे, उमाताई देवईकर, रेवती गोरले, रितू जैन, निर्मला वाढणकर, रजनी गेडाम, सुशीला डोंगरे, रेखा अडेट्टीवार, अनिता ठाकरे, शामन चाचेरे, गुडडी भुर्रे, प्रीती शिडाम, मनीषा ढवळे, सपना दत्ता, लता नैताम, कविता होळी, वैशु इरकूलवार, बोरकर काकू, गनीता वरखडे, वर्षा भोयर, वनीता सेलोटे, मंजुषा खरवडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.