भाजयुमो जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंत्यांना निवेदन

66

– सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची व दोषीअधिकाऱ्यांंवर कारवाईची केली मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कन्नमवार जलाशय रेगडी धरण पाटबंधारे विभाग शाखा चामोर्शी यांच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांच्या हातातला पीक गेल्याने सर्वेक्षण करून सदर शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी व दोषीअधिकाऱ्यांंवर कारवाई करून बडतर्फ करण्यात यावे या मागणीसाठी भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री श्री. मधुकर केशव भांडेकर यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत कुरुड (ता. चामोर्शी) येथील शेतकरी बांधवांनी मा. जिल्हाधिकारी गडचिरोली तसेच कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग गडचिरोली यांना निवेदन देण्यात आले.
पाटबंधारे उपविभाग चामोर्शी येथील सिंचाई शाखा चामोर्शीचे अधिकारी यांच्या चुकीच्या नियोजनामुळे धान पीक निघण्याच्या मार्गावर असताना व धानाला एक पाण्याची नितांत आवश्यकता असताना कन्नमवार रेगडी जलाशयाचा शेतात येणारा पाणी थांबवून शेतकऱ्यांंच्या हातात आलेले पीक करपल्याने संतप्त शेतकरी बांधवांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्यांंवर योग्य कारवाई करावी व नुकसान झालेल्या पिकांंचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी याकरिता तसेच पुरबुडीत यादीमध्ये घोळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांंवर कारवाई करावी, याकरिता शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून मागणी केेली आहे.
पुरबुडीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, तसेच चुकीचे सर्वेक्षण करणाऱ्या तलाठी व कृषी सहाय्यक यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन ग्रामपंचायत कुरुड (ता. चामोर्शी) येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी उपस्थित भाजयुमो जिल्हा महामंत्री मधुकर भांंडेकर यांच्यासह धर्माजी भानू बारसागडे, हिरामण सातपुते, गजानन पिपरे, पत्रुजी शेंडे, रमेश सातपुते, आत्माराम कूळमेथे, मोरेश्वर चलाख, सुरेश येलमुले, दादाजी येलमुले, संपत कुमरे, नामदेव चलाख, रामदास वासेकर, पांडुरंग भुरसे, विलास बारसागडे, वसंत मोरे, नारायण पिपरे, गंगाधर मडावी, लोमेश भोयर, बंडू शेट्टये, काशिनाथ बारसागडे, मुरलीधर कुमरे, वसंत सातपुते, बंडू पिपरे, गणपत बारसागडे, लक्ष्मण चलाख, मारुती बरसागडे, आनंदराव सातपुते, सरदार सातपुते, मोरेश्वर भोयर, पांडुरंग सातपुते, संजय पिपरे व गावातील शेतकरी उपस्थित होते. दोषी अधिकाऱ्यांंवर कारवाई न झाल्यास मोठा जनआंदोलन करण्यात येईल व संबंधिताचा जाहीर निषेध करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.