13 ला सेवानिवृत्त शिक्षकांची सभा

69

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सभा स्थानिक इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहात रविवार, 13 नोव्हेंबर दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेत सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे पहिले तीन हप्ते न मिळाल्याबद्दल चर्चा करणे व त्या संदर्भात आंदोलनाची दिशा ठरविणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिकृतीची सुविधा मिळणे, रेल्वे व एसटीच्या प्रवास भाड्यात सवलत मिळणे, तसेच दर पाच वर्षांनी सेवानिवृत्तांच्या मूळ वेतनात वाढ करणे इत्यादी बाबीवर चर्चा करण्यात येणार आहे. तरी गडचिरोली जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे संयोजक शेषराव येलेकर, राजेंद्र लांजेकर, घनश्याम दिवटे, जगदीश लडके, मुनिश्वर बोरकर, त्र्यंबक करोडकर आदींनी केले आहे.