जि. प. माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांनी मेटीगुड्ड्म येथील नागरिकांशी केली चर्चा

77

– दिवाळी निमित्याने महिलांंना साड़ी वितरण

– गावातील मुलभूत समस्या व नागरिकांच्या समस्या घेतली जाणून

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी तालुका मुख्यालयापासून ७० कि.मि. अंतरावर असलेल्या अति संवेदनाशिल व आदिवासी बहुल क्षेत्र असून ज़िम्मलगटापासून १८ कि.मि.अंतरावर असलेले देचलीपेठा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गांवात स्वांतत्रच्या ७० वर्षानंतर पण या भागाच्या विकास झाला नाही. या भागात अनेक प्रमुख समस्या आवासुन उभे आहेत. या गावांना जाण्यास आजही पक्के रस्ते नाहीत. पुल, विज नाहीत, पिण्याच्या पाण्याची समस्या मात्र याकडे शासन प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. काल जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांनी सदर परिसरात दौर करून मेटीगुड्ड्म येते सभा घेवुन गावात नागरिकांशी सखोल अशी चर्चा केली असता या गावात निर्मितीपासून आम्ही मतदानाचा हक बजावुन लोकप्रतिनिधी निवडून देत असतो. मात्र स्थानिक क्षेत्रातून निवडून आल्यानंतर मात्र याकडे दुर्लक्ष करत असतात. मात्र या गांवात केव्हाच येत नाही समस्या जाणून घेत नाहीत. या परिसराला लागून नदी आहे. त्यामुळे याठिकानी लिफ्ट ऐरीगेशन झाल्यास या परिसरातील शेतकरी सूजलम-सूपलम होतील. तसेच या परिसरात धानाची शेती जास्त प्रमाणात करत असतात. मात्र या ठिकाणी या हंगामात आधारभूत धान खरेदी केंद्र जिम्मलगटा या ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना या परिसरातून धान नेत असताना आर्थिक व मानसिक त्रास सहन करवा लागतो त्यामुळे धान खरेदी केंद्र देचलीपेठा येतंच सुरू करण्यात यावी, अशी विनंती केली असून सदर धान खरेदी केंद्र या ठिकाणी सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी सोबत चर्चा करू, असे सांगितले. यावेळी नागरिकांसोबत तीन तास चर्चा करून समस्या ऐकून घेतले व निराकरण करून देण्याच्या ग्वाही दिली.असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले. दिवाळी असल्याने दिवाळीच्या शुभेच्छा देत महिलांना फराळ व साड़ी भेट देण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी गाव पाटील श्री. गोसाई वेलादी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री. भास्कर तलांडे, माजी सभापती सौ. सुरेखा आलाम, सरपंचा सौ. शांताबाई सिडाम, माजी सरपंचा मडावी. माजी सरपंच श्री. हंनमंतू सिडाम, ग्रापं सदस्या कु. यशोदा पोरतेट, नीलाताई सड़मेक, सत्यम नीलम, रामया मूलकरी, शिवराम पुल्लूरी, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, माजी उपसरपंच श्री. संजय पोरतेट, कार्तिक तोगम, नरेंद्र गरगम आदी मंचावर उपस्थित होते. सभेच्या संचालन व प्रस्ताविक श्री. डॉ. एस. नैताम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. भीमराव मडावी यांनी मानले. यावेळी गावातील नागरिक, महिला बचत गटाचे महिला व युवक उपस्थित होते.