जि. प. माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते माँ. वैष्णवधाम दुर्गा मंदिर आलापल्ली येथे समाज मंदिराचे भूमिपूजन

57

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी तालुक्यांतील आलापल्ली येथे माँ. वैष्णवधाम दुर्गा मंदिर आलापल्ली येथे समाज मंदिर नसल्याने प्रत्येक वर्गातील समाज बांधवांना अडचण भासत होती. गावात माँ वैष्णवधाम दुर्गा मंदिर होती. पण समाज मंदिर नसल्याने वैयक्तिक कार्यक्रम असेल, सण उत्सव असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असेल पण समाज मंदिर नसल्याने आलापल्ली येतील सर्व समाज बांधवांनी गांवात बैठक घेवून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे माँ. वैष्णवधाम दुर्गा मंदिराचे पदाधिकारी व प्रतिष्टित नागरिक यांनी मंदिराच्या बाजूला समाज मंदिर बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली असता जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष यांनी शासनाकडून समाज मंदिर बांधकामासाठी निधी प्राप्त होताच समाज मंदिर देऊ, अशी ग्वाही दिली व मंंजुरी मिळाल्यावर मा. श्री. अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मंडळाचे माँ वैष्णवी दुर्गा मंदिर आलापल्ली मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष मंडळाचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.