सुरजागड लोहप्रकल्प संदर्भात गडचिरोली येथे आज होणारी जनसुनावणी रद्द करून तालुकास्थळ एटापल्ली येथे घेण्यात यावी

52

– उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची निवेदनाद्वारे मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सुरजागड लोह प्रकल्पा संदर्भात २७ ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथे होणारी जनसुनावणी रद्द करून तालुकास्थळ एटापल्ली येथे घेण्यात यावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पाची उत्खनन क्षमता ३ दशलक्ष टन प्रतीवर्ष वरून १० दशलक्ष टन प्रतिवर्ष करण्याचा वाढीव प्रस्ताव कंपनीने गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडे दिलेला आहे. या संदर्भात पर्यावरण विषयक जनसुनावणी २७ ऑक्टोबर रोजी गडचिरोली येतील जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात आले आहे. नियमानुसार ज्या एटापल्ली तालुक्यात तो लोहप्रकल्प आहे त्या ठिकाणी ही जनसुनावणी घेणे अपेक्षित आणि जनतेसाठी सोयीचे असताना तसे न करता मुद्दामहून जिल्हा प्रशासनाने गडचिरोली येथे सदर जनसुनावणी ठेवल्याने स्थानिक अनेक नागरिक ह्या जनसुनावणीपासून वंचित राहू शकतात. तसेच ह्या जनसुनावणीची प्रसिध्दी स्थनिक वृत्तपत्रात तसेच इतर माध्यमातून न झाल्याने ह्या जनसुनावणीबाबत अनेकांना माहिती ही मिळालेली नाही. त्यामुळे बहुतांश स्थानिक नागरिक गडचिरोली येथेे अनुपस्थित राहू शकतात. तसे झाले तर आपले मनने ते सदर जनसुनावणी दरम्यान मांडू शकनार नाही. वाढीव १० दसलक्ष टन प्रतिवर्ष उत्खनन क्षमता झाली तर सुरजागड प्रकल्प परिसरातील १३ गावांना त्यांच्या धोका निर्माण होहू शकतो. तसेच सद्या सुरू असलेल्या सुरजागड प्रकल्पाने अहेरी विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली असून, अपघाताचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. स्थानिक बेरोजगारांना नोकरी नाहीच्या बरोबरीने मिळालेली आहे. तसेच प्रदूषण ही नियंत्रनाच्या बाहेर गेले आहे. त्यामुळे स्थानिक जनतेमध्ये सुरजागड लोह प्रकल्पाबाबत प्रचंड नाराजी आहे. ही जनभावना विचारत घेऊन वाढीव उत्खननाला वरील सर्व समस्या मार्गी लागेेपर्यंत मान्यता देऊ नये, असे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी निवेदनात म्हटले आहे.

सुरजागड लोह प्रकल्पाबाबतीत गडचिरोली येते २७ ऑक्टोबर रोजी होणारी जनसुनावणी रद्द करून एटापल्ली ह्या तालुकास्थळी ती जनसुनावणी घेण्यात यावी. तसेच ह्यासाठी स्थानिक वृत्तपत्रात व इतर माध्यमातून व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी, ही अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेची मागणी आपण विचारात घेवून योग्य तो निर्णय घ्यावा, अशीही मागणी माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली आहे.