देवी माँ बळीराजाच्या घरी सुख, समृद्धी, भरभराटी नांदू दे : शिवसेना गडचिरोली जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांचे शारदा-दुर्गा मातेकड़े साकडे

57

– गडचिरोली तालुक्यातील मौशिखांब -मुरमाड़ी जिल्हा परिषद क्षेत्रातील देवींंचे घेतले कात्रटवार यांनी दर्शन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शिवसेना गडचिरोली जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी नवरात्र उत्सव पर्वात गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब- मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील सार्वजनिक दुर्गा, शारदा उत्सव मंडळाला भेटी देऊन देवीचे दर्शन घेतले. शेतकऱ्यांवरील संकटे नाहीशी होऊन त्यांना सुखसमृध्दी लाभावी यासाठी दुर्गा शारदा मातेला साकडे घातले. शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दवसाहेब ठाकरे यांना अधिक बळ प्राप्त होऊन त्यांना दुर्जनांचा सामना करण्याची प्रचंड शक्ती दे आणि महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढनाऱ्या हिंदू हदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे साहेबांनी निर्माण केलेल्या शिवसेनेला अधिक उभारी दे, अशी मनोकामना शिवसेना गडचिरोली जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी देवीककड़े केली. याप्रसंगी यादवजी लोहबरे, नवनाथ ऊके, संजय बोबाटे, स्वप्निल खांडरे, संदीप भुरसे, निकेश लोहबरे, राहुल सोरते, अरुण बारापात्रे यांच्यासह दुर्गा शारदा मंडळाचे सदस्य व गावकरी उपस्थित होते.