रा. स्व. संघाच्या विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन कार्यक्रमात आमदार डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती

127

– संघाच्या पूर्ण गणवेशासह पथसंचलनात घेतला सहभाग

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गडचिरोली नगराचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव अभिनव लॉनच्या पटांगणावर शनिवारी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी संघाच्या पूर्ण गणवेशासह पूर्णवेळ उपस्थित होते.

यावेळी त्यांनी सायंकाळी ४: ३० वाजता निघालेल्या पथसंचलनातही सहभाग घेतला. त्यानंतर झालेल्या विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन कार्यक्रमातही ते पूर्णवेळ उपस्थित होते. कार्यक्रमानंतर त्यांनी उत्सवाला उपस्थित संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांशी हितगुज साधला.