हेमकृष्ण बहेकार आचार्य पदवीने सन्मानित

55

विदर्भ क्रांती न्यूज

गोंदिया : येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अथेलेटिक प्रशिक्षक हेमकृष्ण बहेकार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबादने शारीरिक शिक्षण विषयातील संशोधनासाठी नुकतेच आचार्य पदवीने सन्मानित केले.
गोंदिया येथील निवासी हेमकृष्ण शेषराम बहेकार यांचा संशोधनाचा विषय ठाणे जिल्ह्यातील नवशिक्या खेळाडूंच्या हॉप-स्टेप-जंप क्षमतेवर स्वतःच्या शरीराच्या ताकदीच्या व्यायामाचा प्रभाव हा होता. त्यांनी हा शोध प्रबंध देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद येथील डॉ. शेखर शिरसाट यांच्या मार्गदर्शनात पूर्ण केला. बहेकार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबादच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. कल्पना झरेकर यांनी मोलाचे सहकार्य केले. सोबतच येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा महाजन, शारीरिक शिक्षक डॉ. परवीन कुमार, सैनिकी शाळा गोंदियाचे आनंद मकवाना व जिल्हा क्रीडा अधिकारी घनशाम राठोड यांनी मोलाचे सहकार्य केले. बहेकार यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील आणि पत्नीला दिले आहे. त्यांच्या यशाबद्दल नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालय परिवार, जिल्हा क्रीडा अधिकारी घनशाम राठोड व मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे.