– चांदाफोर्ट, (वडसा)- देसाईगंज- गोंदिया या रेल्वे मार्गावरील पॅसेंजर गाड्या चालू होणार. सुपरफास्ट ट्रेनचे स्टॉपेस (थांबा) सुध्दा होणार
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : खा. अशोकजी नेते यांनी रेल्वे संबंधित अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लाऊन सततच्या केलेल्या पाठपुराव्याला व प्रयत्नाला अखेर यश आले. मागील दोन वर्षे कोरोणाच्या काळात रेल्वे पॅसेंजर गाड्या बंद होत्या. पण खा. अशोकजी नेते यांच्या प्रयत्नाने गाडी नंबर- ०८८०६,०८८०८,०८८०५, चांदाफोर्ट, वडसा – (देसाईगंज), गोंदिया इत्यादी पॅसेंजर गाड्या चालु होणार. तसेच सुपरफास्ट ट्रेन स्टॉपेजेसच्या मागणीनुसार जनतेच्या रेल्वे संबंधित समस्या लक्षात घेऊन जनतेच्या सोयी सुविधाच्या अनुषंगाने जनतेला प्रवासाच्या दृष्टिकोनातून जनतेला ये- जा करण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर पॅसेंजर गाड्या चालू होणार व जनतेच्या मागणीप्रमाणे संसदेत प्रश्न मांडून व केंद्रीय रेल्वेमंत्री यांना निवेदनाद्वारे व पाठपुराव्यामुळे पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू होणार व सुपरफास्ट ट्रेनचे स्टॉपेज (थांबा) सुद्धा होणार या केलेल्या प्रयत्नाने गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री. अशोकजी नेते यांनी अखेर जनतेच्या हिताच काम यशस्वीरित्या पूर्ण झालं याच समाधान खासदार यांनी व्यक्त केले. सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी, जनकल्याणासाठी या क्षेत्राचा खासदार म्हणून कटीबद्ध आहे, असे उद्धगार याप्रसंगी काढले.