चांदाळा रोड गडचिरोली येथील गोटुल भूमीवर आदिवासी देवी-देवतांची आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते पूजन

71

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदिवासीं बांधवांसाठी पवित्र स्थळ असणाऱ्या चांदाळा रोडवरील गोटूल भूमी येथे दसऱ्याच्या शुभ पर्वावर दरवर्षीप्रमाणे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी आदिवासी देवी- देवतांची पूजा केली.

याप्रसंगी आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते नंदूभाऊ नरोटे, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाचे महामंत्री प्रकाशजी गेडाम, मोहनभाऊ पुराम, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. अनिलभाऊ कुनघाडकर, बाबुरावजी कुलसंगे, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, राहुल कन्नाके, सुधीर मसराम, सदाराम काटेंगे, देवेंद्रजी मांडवे यांच्यासह गोटूल समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

गोटूलभूमी ही आदिवासी बांधवांसाठी पवित्र स्थळ असून त्यातून आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळत असते. दरवर्षी या ठिकाणी हजारो आदिवासी बांधव पुजेकरिता येत असत. मात्र कोरोनामुळे या ठिकाणी प्रतिबंध आल्याने कार्यक्रम घेण्यास अडचणी आल्यात. पुन्हा नव्याने या गोटुल भूमीवर आदिवासी समाजाला प्रेरणा मिळेल असे कार्यक्रम नक्कीच आयोजित केले जातील, असा विश्र्वास आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी याप्रसंगी व्यक्त केला.