– संत निरंकारी मंडळ चामोर्शीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे हस्ते उद्घाटन
– राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाड्याचा रक्तदान शिबिराच्या आयोजनाने समारोप
– भाजपा जिल्हाध्यक्ष तथा निरंकारी मिशनचे प्रमुख किसनजी नागदेवे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आपण केलेल्या रक्तदानाने दुसऱ्याला जीवन मिळत असून यापेक्षा कोणतेही दान हे श्रेष्ठ नसल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी चामोर्शी येथील निरंकारी सेवा मंडळाच्या वतीने “सेवा पंधरवडा” निमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले.
यावेळी निरंकारी मिशनचे प्रमुख श्री. किसनजी नागदेवे, चामोर्शी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई वायलालवार, नगर पंचायत उपाध्यक्ष लोमेशभाऊ बुरांडे, बांधकाम सभापती वैभवजी भिवापुरे, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मधुकरजी भांडेकर, भाजप तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, महामंत्री साईनाथजी बुरांडे यांच्यासह निरंकारी मिशनचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसापासून ते महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवडा संपूर्ण देशभरामध्ये साजरा करण्यात येत असून त्याचा समारोपीय दिवस आहे. त्यानिमित्ताने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.