जिल्हा काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्रीजी यांना अभिवादन

54

– जयंतीनिमित्त भारत जोडो अभियानाच्या पोस्टरचे लोकार्पण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली पदयात्रेच्या माध्यमातून विविध संस्कृती आणि बोलीभाषेने व्यापलेल्या भारताला जोडण्यात आले आणि त्या माध्यमातूनच देशाचा स्वातंत्र्य लढा उभा राहिला. देश्याच्या स्वातंत्र्यानंतर कधी नव्हे तर मागील 8 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात धार्मिक व जातीय दंगली वाढल्या असून सर्वत्र अराजकता वाढलेली आहे. त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. अश्या समाजाला आणि पर्यायाने भारतला जोडून द्वेष मुक्त भारताच्या निर्मितीसाठी काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते कश्मीर 3500 किमी अशी भारत जोडो पदयात्रा सुरू झालेली आहे. ही पदयात्रा नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात प्रवेश करणार असून ते 16 दिवस महाराष्ट्रातून जाणार आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातून 5000 हुन अधिक संख्येने काँग्रेस नेते, कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहावे. सोबतच सामन्य नागरिकांचा सुद्धा यात सहभाग लाभावा याकरिता जिल्हा काँगेसच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते भारत जोडो पदयात्रेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, शहर अध्यक्ष सतिश विधाते, प्रदेश प्रतिनिधी हसनअली गिलानी, समशेरखान पठाण, शंकरराव सालोटकर, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष राजनिकांत मोटघरे, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, रोजगार स्वयंम रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, अनुसूचित जाती महिला अध्यक्ष अपर्णा खेवले, जिल्हा कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, ता. अध्यक्ष नेताजी गावतुरे, वासेकर, शालीग्राम विधाते, काशिनाथ भडके, आय. बी. शेख, प्रभाकर कुबडे, अब्दुल पंजवाणी, राजाराम ठाकरे, हरबाजी मोरे, भैयाजी मुद्दमवार, रुपेश टिकले, वसंत राऊत, अरुण पुण्यपरेड्डीवार, दीपक रामने, संजय चन्ने, सुभाष धाईत, मयुर गावतुरे, माजिद स्ययद, जावेद, खान, सत्यविजय देवतळे सह अन्य मान्यवर व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.