महिला ही अबला नसून आदिशक्ती जगदंबेचे रूप : शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांचे प्रतिपादन

69

– घटस्थापनेच्या पावन पर्वावर कात्रटवार यांच्या वतीने मौशिखाब – मुरमाड़ी जिल्हा परिषद क्षेत्रातील आंंबेशिवनी टोली येथील शेकडो माता-भगिनींचा वस्त्रभेट देवून केला सन्मान

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : पुर्वीच्या काळी ‘चुल आणि मुल’ यापुरतेच महिलांचे अस्तित्व होते. आजच्या आधुनिक काळात पुरूष प्रधान संस्कृती मोडीत काढीत आजची महिला ही सर्वच क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने काम करीत आहे. महिलांचे मोठया प्रमाणात सक्षमीकरण घडून येते आहे. महिलांनी स्वतला कमजोर न समजता अन्यायाविरोधात लढा देऊन संकटाचा सामना केला पाहिजे. महिला ही अबला नसून आदिशक्ती जगदंबेचे रूप आहे, असे प्रतिपादन शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले. नवरात्री घटस्थापनेच्या पावन पर्वावर शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ काटत्रवार यांच्या वतीने गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब – मुरमाडी जि. प. क्षेत्रातील आंबेशिवणी टोली येथे माता भगिनींसाठी वस्त्रभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपस्थित माताभगिनींना संबोधीत करताना शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार पुढे म्हणाले की, शिवसेनाला आदर्श संस्काराचा वारसा लाभला आहे. जनसेवेला केंद्रबिंदू मानून शिवसेनेची वाटचाल सुरू आहे. महिला हा समाजाचा प्रमुख घटक असून त्यांना सन्मानाने जीवन जगता आले पाहिजे. महिलांना सन्मानाने जगण्याचा पुर्णपणे अधिकार आहे. त्यामुळे महिलांनी सुध्दा मनामध्ये कोणताही न्युनगंड न बाळगता आम्ही अबला नसून सबला आहोत, हे आपल्या कार्य कर्तुत्वाने समाजाला दाखवून द्यावे. नारीशक्ती ही अफाट असून धैर्याने सामना करण्याची गरज आहे. दुष्टरूपी राक्षसांचा संहार करणारी माता आदिशक्ती दुर्गा ही नारीच आहे. मनात दृढनिश्चिय केला तर कठीनात कठीण समस्या सुटू शकते आणि सत्याचा विजय होतो, असे शिवसेना सहसपंर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले. खरा समाजसेवक नेहमीच समाजाच्या पाठीशी असतो. त्यामुळे शिवसेनेचा एक कट्टर शिवसैनिक म्हणून मी सदैव जनतेच्या पाठीशी राहीन आणि कोणतीही समस्या असल्यास ती अवगत करून दिल्यास जनतेला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही कात्रटवार यांनी वस्त्रभेट कार्यक्रमाप्रसंगी दिली. कार्यक्रमाला उपस्थित शेकडो महिलांनी अरविंदभाऊ कात्रटवार यांनी दिलेल्या वस्त्रभेटीची प्रशंसा करून जनसेवेचे कार्य तुमच्या हातून सदैव घडत राहो आणि माता भवानी तुम्हाला उदंड शक्ती देवो, अशी मनोकामना व्यक्त केली. या प्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख किशोर पोद्दार, सह संपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार, जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके, नंदू कुमरे, यादवजी लोहबरे, संजय बोबाटे, संदीप भुरसे, सूरज उईके, संदीप अलबंनकर, स्वप्निल खांडरे, राहुल सोरते, निकेश लोहबरे, अरुण बारापात्रे, राजू जवादे, रामदाज़ बामनवाडे, अमित बानबाले, निरंजन लोहबरे, सूरज चांग यांच्यासह आंंबेशिवनी टोली येथील शेकडो माता भगिनी, गावकरी व शिवसैनिक उपस्थित होते.