रंगतरंग दुर्गा उत्सव मंडळ वडधातर्फे प्रतिष्ठीत नागरिक व गुणवत्ताप्राप्त विधार्थ्यांचा सत्कार

43

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दि. ३ ॲाक्टोबर २०२२ रोजी रंगतरंग दुर्गा उत्सव मंडळ वडधा ता. आरमोरी जि. गडचिरोलीच्या वतीने आयोजित प्रतिष्ठीत नागरीकांचा व गुणवत्ताप्राप्त विधार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. नामदेव किरसान महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी, कार्यक्रमाचे अध्यक्ष वामनराव सावसाकडे जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस, जीवनजी कोलते, भुपेशजी कोलते, रामचंद्रजी भजभुजे, माजी जि. प. सदस्य वनिताताई सहाकाटे, सत्कारमुर्ती आर. एन. खेवले, श्री. नवघडे, ज्यांची पोलीस शिपाईकरिता निवड झाली त्या शितल वालदे, ज्यांनी आपले अवयव दान केले असे जैरामजी मेश्राम व प्रतिष्ठीत नागरीक यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी काँग्रेसच्या भारत जोडो पदयात्रेची माहिती देऊन जास्तीत जास्त संख्येने महाराष्ट्रात सहभागी होण्याचे आवाहन केले.