जय शारदा उत्सव मंडळ चामोर्शी (माल) च्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त कोल्हापुरी नृत्याचे आयोजन

55

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दि. ३ ॲाक्टोबर २०२२ रोजी जय शारदा उत्सव मंडळ चामोर्शी (माल) ता. आरमोरी जि. गडचिरोली यांनी नवरात्र उत्सव निमित्ताने न्यु कोल्हापुरी नृत्य समुहाच्या नृत्यांचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, कार्यक्रमाचे अध्यक्ष वामनरावजी सावसाकडे जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस, प्रमुख पाहुणे मधुकरभाऊ दोनाडकर, शालीकभाऊ पत्रे, विजयजी सुपारे, ऍड. विजयजी चाटे, नंदुजी खानदेशकर, सहउद्घाटक धर्मेन्द्रजी घोडाम, निलकंठभाऊ गोहने, तुळशीरामजी मेश्राम, दिपकभाऊ मुरांडे, वंदनाताई मुगंरे, वामनभाऊ राऊत, सुरजभाऊ हनवते, मनोहरजी नागापुरे, भाऊरावजी राऊत, रामभाऊ मुगंरे, अलोकजी गोहने, संगीता ताई कोटांगले, दर्शनाबाई घोडाम, प्राजक्ता जनबंधु व प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.