– अरविंदभाऊ कात्रटवार शिवसेना सहसंपर्क प्रमुख यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिक एकवटले
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : शिवसेनेचे कार्याध्यक्ष मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्याशी कोणी दगाबाजी करून बाहेर गेले असले तरी हिंदु हदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला काहीही फरक पडत नाही. खरी शिवसेना ही मा. बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांची आहे. खरा शिवसैनिक हा मा. बाळासाहेबांच्या विचारांनी पेटून उठणार आहे. त्यामुळे आमची लढण्याची ताकद आणि हिंमत कायम असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ताकदीने लढून मा. उध्दवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात शिवसेनचा भगवा झेंडा फडकविणारच, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांनी केले. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील शिवसेना, महिला आघाडी आणि युवासेनेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांची बैठक गडचिरोली येथील चामोर्शी मार्गावरील कात्रटवार कॉम्प्लेक्स मधील कमल – केशव सभागृहात पार पडली. या बैठकीसाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील शेकडो शिवसैनिकांनी उपस्थिती दर्शवून आम्ही शिवसेनेचे मावळे मा.उध्दवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहोत, हे दाखवून दिले.शिवसैनिकांना संबोधीत करताना पोतदार पुढे म्हणाले की, गडचिरोली जिल्हयाच्या विकासाला गती मिळावी आणि जिल्हयातील शिवसैनिकांच्या हाताला काम मिळावे आणि पक्षसंघटन मजबूत व्हावे यासाठी मा. उध्दवसाहेब ठाकरे यांनी एकनाथजी शिंदे यांना गडचिरोलीचे पालकमंत्री बनविले. परंतू अडीच वर्षाच्या काळात शिंदे यांनी पक्षाच्या हिताचे कोणतेही काम केले नाही आणि शिवसैनिकांना कोणेतही काम मिळाले नाही. केवळ विकासाच्या बाता मारून उंटावरून शेळया हाकलण्याचे कामे त्यांनी केले. शिवसैनिक हा लढणारा आहे. तो कोणत्याही भुलथापांना बळी पडणार नाही. गडचिरोली जिल्हयात होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद ,पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेना ताकदीने लढणार असून या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडविण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहनही किशोर पोतदार यांनी केले.
यानंतर मार्गदर्शन करताना शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले, शिवसेनेची ताकद दाखवून देणार. शिवसेना ही संघर्षातून निर्माण झालेली सेना आहे. अन्यायाविरोधात लढण्यासाठी आणि जनतेच्या समस्या सोडवून न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनाच सर्वप्रथम पुढे येते.मराठी बाणा आणि मराठी माणासाच्या हितासाठी शिवसेना नेहमीच पुढे राहिली आहे. कितीही संकटे आले तरी कट्टर शिवसैनिक कदापाही मागे हटत नाही. आम्ही हिंदु हदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे कट्टर शिवसैनिक आहोत. जे मा. उध्दवसाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी करून बाहेर पडले. त्यांच्या मागे गडचिरोली जिल्हयातील एकही खराखुरा शिवसैनिक नाही. मा. बाळासाहेबांच्या विचारानी प्रेरीत असलेला खरा शिवसैनिक अद्यापही शिवसेनेत कायम आहेत. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ताकदीने लढून खऱ्या शिवसेनेचे अस्तित्व दाखून देण्यासाठी समस्त शिवसैनिकांनी तयार राहावे, असे प्रतिपादन शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी यावेळी वक्त केले. शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका छायाताई कुंभारे म्हणाल्या की, शिवसेना ही मराठी माणसांची सेना आहे. त्यामुळे राजधानी मुंबईवर आपल्या मराठी माणसाचे प्राबल्य आहे. संघर्षातूनच शिवसेनेचा जन्म झाला आहे. त्यामुळे कितीही संकटे आली तरी शिवसेना कधी संपणार नाही ती संपविण्याची कोणामध्ये ताकद नाही. कट्टर शिवसैनिक अद्यापही शिवसेनेत कायम आहे. भविष्यात शिवसेना अधिक मजबूत होईल यासाठी सर्वांनी अधिक जोमाने काम करण्याची गरज असल्याचे छायाताई कुंभारे म्हणाल्या. या कार्यक्रमाला उपस्थित शिवसेना संपर्क प्रमुख किशोर पोतदार, सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार, सहसंपर्क प्रमुख विलास कोडापे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका छायाताई कुंभारे, जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके, शहर प्रमुख रामकिरित यादव, माजी नगर अध्यक्ष अश्विनीताई यादव, विधानसभा संघटक नंदू कुमरे, तालुका प्रमुख अमित यासलवार, गजानन नैताम, शेखर उईके, उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, किरण शेडमाके, ज्ञानेश्वर बगमारे, संजय बोबाटे, संदीप अलबंनकर, संदीप भुरसे, स्वप्निल खांडरे, राहुल सोरते, निकेश लोहबरे, अरुण बारापात्रे, राजू जवाड़े, दिलीप वलादे, निकेश मड़ावी, सचिन स्लोटे, मधुकर बावने, गणेश ब्रामनवाड़े, सूरज उइके, दयाराम चापले, रमेश चनेकर, मुकरु चांग, तुलशिराम मेश्राम, नीलकंठ दुमाने, निखिल दिवटे, सचिन जुवारे, पवन हर्षे, प्रशांत ठाकरे, दिलीप लाडे, नादु भैसारे, निरंजन लोहबरे, जगन चापले, रविन्द्र मिरास, त्र्यम्बक फुलझेले, राजू निकुरे, संजय गेडाम, उमेश जमभुड़कर, किसान धवले, टेकाम भैसारे, रविंद्र धनफोड़े, संजय करते, राजेन्द्र झरकर, अमित बनबाले, नानजी हतबले, गुरुदेव सूर्यवंशी, महेश मड़ावी, नरेंद्र बुरांडे, चंद्रभान चंदेकर, अजय कंबड़े, चेतन हजारे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.