गडचिरोली जिल्ह्यात उगम पावलेली शिवनाथ नदी ही छत्तीसगड राज्याची गोदावरी : डाॅ. नामदेव उसेंडी

35

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्रात उगम पावलेली शिवनाथ नदी ही छत्तीसगड राज्याची वैनगंगा, गोदावरी महाराष्ट्रात ज्या प्रकारे त्र्यबंकेश्वरला गोदावरीचे उगमस्थान समजतात त्याच प्रकारे छत्तीसगड राज्याला सुजलाम सुफलाम करणारी शिवनाथ नदीचे उगम स्थान कोरची तालुक्यातील कोटगुल जवळील गोडरी या गावामध्ये असून या स्थळाला छत्तीसगड राज्यातील जनता त्र्यबंकेश्वर सारखा श्रध्दास्थान मानतात. म्हणूनच छत्तीसगडमधील मोहला मानपूरचे आमदार व संसदिय सचिव मंत्रालय रायपूर श्री. इंदरशहा मडावी व त्यांच्या शेकडो समर्थकांनी गोडरी येथे येवून शिवनाथ नदीच्या उगमस्थानाची शेकडो कार्यकत्र्यांसह श्रध्देने पूजा अर्चना केली. गोडरी येथून उगम पावणारी शिवनाथ नदी संपूर्ण छत्तीसगड राज्यामध्ये त्याचे पात्र महाराष्ट्रातील गोदावरी, वैनगंगा सारखे विस्तृत होवून छत्तीसगड राज्याला सिंंचनाच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम केल्यानेच छत्तीसगड राज्याला देशात ‘धान का कटोरा’ हा मान सन्मान प्राप्त झाला असल्याने महाराष्ट्र सरकारने या उगम स्थानाला धार्मीक पर्यटन स्थळाचा दर्जा देवून क्षेत्राचा सर्वांगीन विकास करावा, अशी मागणी आमदार व संसदिय सचिव मंत्रालय रायपूरचे श्री. इंदरशहा मडावी यांनी केली.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस महासचिव तथा माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी हे सुध्दा उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनीे समयोचीत मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, शिवनाथ नदीचे उगमस्थान हे महाराष्ट्रात असणे ही महाराष्ट्रासाठी गर्वाची बाब असून आजपर्यंत हे स्थळ दुर्लक्षीत राहिले. परंतु यानंतर मात्र महाराष्ट्र सरकारच्या पर्यंटन विभागाकडे पाठपुरावा करुन या क्षेत्राचा विकास करण्याचे आश्वासन डाॅ. नामदेव उसेंडी यांनी दिले. यावेळी कोरची तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी मनोज अग्रवाल, छत्तीसगड राज्याचे संजय जैन ,लखगणुराम कार्यपाल, दिनेशशहा मांडवी, लच्छु सावले, अभिमन्यू मडावी, सुजाण पुराम, श्रीमती उमाताई पटेल, नारद कातलाम, भालचंद्र कोरेटी, मीनाताई माली, अब्दुल खालिक, राजेश नैताम, परमेश्वर लोहबरे, माजी पं. स. सदस्य मारगाये, गुलफिगारजी, आतलाम, पत्रकार वैरागडे, ईश्वर कोरेटी, प्रेमलाल उसेंडी, उत्तम कोरेटी, धनंजय ताटपलन, भुवन मुलेटी, पंकज बघवा, दयाराम पढरे, हिरा आडूलवार, अर्जुन कोरेटी, पन्नालाल फुलारे, विनोदकुमार कोरेटी, पूरणशाह कोरेटी आदी बहुसंख्येने युवक, युवती, महिला, ग्रामवासी उपस्थित होते.