शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात करीयर बनवा : माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी

48

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कोरची तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त देऊळभट्टी येथे न्यु एकता आदिवासी क्रिडा मंडळातर्फे 1 दिवसीय डे-नाईट भव्य प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन केलेले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणुन छत्तीसगड राज्यातील मोहला मानपूर विधानसभेचे आमदार तथा संसदीय सचिव श्री. इंदरशहा मडावी होते. तर अध्यक्ष म्हणुन माजी कृषी सभापती नानाभाऊ नाकाडे व प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदेशाध्यक्ष आदिवासी विभाग तथा माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी हे होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना डाॅ. नामदेव उसेंडी म्हणाले की, देऊळभट्टी हे गाव सामाजिक व सांस्कृतिकदृष्टया छत्तीसगड व महाराष्ट्रला जोडणारे असुन या भागातील बहुसंख्य जनता ही छत्तीसगड मधील जनतेशी रुढी भेटीचा व्यवहार करत असल्यानेच या कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील व छत्तीसगडमधील बहुसंख्येने स्पर्धक सहभागी झालेले आहे. त्यामुळे छत्तीसगड व महाराष्ट्रातील सामजिक व सांस्कृतिक संबंध दृढ करण्याचे माध्यम हे स्पर्धा करत आहेत. त्यासाठी छत्तीसगड सरकारने महाराष्ट्र राज्यात येण्याजाण्यासाठी दळणवळणाच्या सुविधा वाढाव्यात अशी मागणी करण्यात आली. कोटगुल परिसरातील लोकांची विद्युत समस्या दुर करण्यासाठी कोटगुल येथे 33 के.वि. चे सबस्टेशन महाविकास आघाडीने मंजुर केलेले होते. परंतु शिंदे व फडणवीस सरकारने त्या कामांना स्थगिती दिल्यामुळे ते काम सुरु होवू शकले नाही, अशी टिकाही शिंदे – फडणवीस सरकारवर करण्यात आली. वास्तविक पाहता सद्याचे मुख्यमंत्री हेच गडचिरोली जिहयाचे पालकमंत्री होते. त्यामुळे गडचिरोली जिल्हयातील विकासाच्या मंजुर कामांना स्थगिती देण्यापुर्वी विचार करायला पाहिजे होते. परंतु सद्याच्या स्थगिती सरकारने गडचिरोली जिल्हयातील मंजूर झालेल्या विकास कामांना स्थगिती दिल्यामुळे विकास कामे खुटंलेली आहेत. या कामावरील स्थगिती त्वरीत उठविण्याची मागणी करण्यात आली, अन्यथा काँँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा देण्यात आला. कब्बडी खेळामुळे शरीर निरोगी आणि स्वस्थ राहाते. आयोजकांनी यापुढे देखील अशाच विविध स्पर्धांचे आयोजन करावे जेणेकरून युवावर्गाला आपले कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. व ग्रामीण भागातील युवक- युवती शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात करीयर बनवण्याचे प्रयत्न करतील, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष आदिवासी विभाग तथा माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी यांनी केले आहे.
उद्घाटन स्थानावरुन बोलताना आमदार इंदरशहा मडावी यांनी असे म्हटले की, छतीसगड राज्याची निर्मीती महाराष्ट्रा नंतर होवून सुध्दा सीमा भागातील विकासकामे छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री भुपेश बघेल यांच्या नेतृत्वात झपाटयाने सुरु आहेत. मागासलेला छत्तीसगड राज्य हाच प्रगती पथावर असून प्रगत महाराष्ट्र राज्यच मात्र गडचिरोली जिल्हयाच्या विकासाकडे दुर्लक्ष होण्याचे चित्र दिसून येते. देशातील महागाई, बेरोजगारी व वाढत चाललेली जाती धर्मातील व्देष भावना देशहिताच्या विरोधी असून जागृक जनतेने सत्यतेसाठी कटु कारस्थान रचणा-या भाजप सरकारला धडा शिकवण्याचाी गरज आहे असे आमदार तथा संसदीय सचिव श्री. इंदरशहा मडावी यांनी म्हटले आहे.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना नानाभाऊ नाकाडे म्हणाले की, जिल्ह्यातील विकासकामे महाविकास आघाडी सरकारने मंजूर केले होते. परंतु शिंदे – फडणवीस यांच्याच भारतीय जनता पक्षाचे आमदार खासदार, असताना सुद्धा गडचिरोली जिल्ह्यातील विकासमांना स्थागिती देत असल्याने लोकप्रतिनिधी कूचकामी ठरलेले आहे. यावेळी कोरची तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी मनोज अग्रवाल, छत्तीसगड राज्याचे संजय जैन, लखगणुराम कार्यपाल, दिनेशशहा मांडवी, लच्छु सावले, अभिमन्यू मडावी, सुजाण पुराम, श्रीमती उमाताई पटेल, नारद कातलाम, भालचंद्र कोरेटी, मीनाताई माली, अब्दुल खालिक, राजेश नैताम, परमेश्वर लोहबरे, माजी पं. स. सदस्य मारगायेंजी, गुलफिगारजी, आतलांमजी, पत्रकार वैरागडे, ईश्वर कोरेटी, प्रेमलाल उसेंडी, उत्तम कोरेटी, धनंजय ताटपलन, भुवन मुलेटी, पंकज बघवा, दयाराम पढरे, हिरा आडूलवार, अर्जुन कोरेटी, पन्नालाल फुलारे, विनोदकुमार कोरेटी, पूरणशाह कोरेटी आदी बहुसंख्येने युवक युवती महिला ग्रामवासी उपस्थित होते.