राज्य सरकारच्या निर्णयाचे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे स्वागत

61

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाने कळविल्याप्रमाणे मंगळवार दि. 27 सप्टेंबर 2022 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृह सुरु करणे, ५० विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती देणे व पोलीस भरती आदी राज्य सरकारच्या निर्णयाचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून स्वागत करण्यात आले आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे इतर मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृहे सुरु करणार तथा इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आता ५० विद्यार्थ्यांना मिळणार व पोलीस शिपाई संवर्गातील २०२१ मधील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट देवून एकूण २० हजार पदे गृह विभागातर्फे भरणार, आदी निर्णय राज्य सरकारने दि.२७ ला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाने राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांच्या नेतृत्वात मागील अनेक वर्षापासून ओबीसी विद्यार्थ्यांकरीता वसतीगृहे, परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व पोलीस भरती याकरिता विविध आंदोलने केलीत व राज्य सरकारकडे मागणीचा रेटा लावून धरला होता. अनेकदा निव्वळ आश्वासनाव्यतिरीक्त ओबीसींना काहीही प्राप्त झाले नाही. मात्र आता राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतल्याने ओबीसी विद्यार्थ्यांमध्ये आनंद झाला आहे व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, कार्याध्यक्ष विनायक बांदुरकर, उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, सचिव प्रा. देवानंद कामडी, कोषाध्यक्ष डॉ. सुरेश लडके, संघटक चंद्रकांत शिवणकर, सुरेश भांडेकर, युवा अध्यक्ष राहुल मुनघाटे, उपाध्यक्ष राहुल भांडेकर, पंकज खोबे, सूरज डोईजड, महिला जिल्हाध्यक्ष संगीता नवघडे, महिला शहराध्यक्ष सोनाली पुण्यपवार, महिला संघटक, ज्योती भोयर, सुधा चौधरी, विभागीय उपाध्यक्ष भावना वानखेडे, किरण चौधरी, मंगला कारेकर इत्यादींनी या निर्णयाबद्दल राज्य सरकारचे आभार मानले आहे.

प्रा. शेषराव येलेकर