वरिष्ठ स्तरावरून चौकशीबाबत कोणतेही आदेश नाहीत : जिल्हाधिकारी

43

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाविरूद्ध शेतकरी कामगार पक्ष गडचिरोली यांनी वरिष्ठ स्तरावरील चौकशीबाबतची माहिती काही माध्यमांना दिली आहे. यामध्ये फक्त शेकापची बोगस तक्रार विविध माध्यमांना फॉरवर्ड केलेली असून वरिष्ठ स्तरावरून याबाबत कोणतेही आदेश दिलेले नाहीत. सदर माहिती दुर्भावनापूर्ण हेतू असलेली आहे. यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. याबाबत प्रशासनाची जाणूनबुजून बदणामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये कोणतेही तथ्य नसून निव्वळ अफवा आहे. कोणत्याही राज्य शासनाच्या विभागाने याबाबत तसे पत्र दिले नाही. सदर माहिती चुकीची असल्याचे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.