आदर्श क्लब श्रीनगर यांच्या वतीने आयोजित भव्य फूटबाल स्पर्धेचे माजी जि. प. अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण

66

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मुलचेरा तालुक्यात येत असलेल्या श्रीनगर येते आदर्श क्लब तर्फे फूटबॉल स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते. सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला, दुुसरा असे दोन पुरस्कार या ठिकाणी देण्यात आले आहे. आज सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. रविंद्र शहा, अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री. भास्कर तलांडे, सुंदरनगरचे उपसरपंच संजय सरकार, ग्रा. पं. सदस्य बबलू शेख, व्यापारी, कमलेश सरकार, पोलीस पाटील आशाताई सरदार, सुनील सरकार, भा.ज.पा. युवा मोर्चा ता. उपाध्यक्ष श्री. किशोर मल्लिक, मौहुर्लीचे ग्रा. पं. सदस्या सुनंदा सिडाम, दिशा नैताम, राबिन मिस्त्री, रणजीत काका, सुकुमार दास आदी मंचावर उपस्थित होते. यावेळी प्रथम विजेता संघ गणेशनगर तर उपविजेता संघ भवानीपूर यांना पारितोषिक व शिल्ड मान्यवराच्या हस्ते देण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन श्री. संजय बिश्वास, तर आभार प्रदर्शन अमर दास यांनी केली. यावेळी खेळाडू व गावकरी उपस्थित होते.