अस्वलाच्या हल्ल्यात इसम जखमी : माजी जि. प. अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांनी दवाखान्यात भेट देवून केली आर्थिक मदत

61

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील गुड्डीगुड्म गावातील इसम नामे व्येंकटी पापया चौधरी वय ६० वर्ष यांनी आज सकाळी जंगलात शेळी चराईसाठी घेले असता जंगलात ठाम मांडून बसलेला अस्वलाने सदर इसमावार झडप मारून हल्ला केला. सदर इसमाच्या पाठीवर व पायांवर जळप मारून हल्ला केल्याने जखमी झाला आहे. प्रसंग सावधानीने ते अस्वलाच्या तावडीतून सुटले असून सदर इसमाला अहेरी येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असून प्राथमिक उपचार करून इसमाला गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले असुन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांनी सदर दवाखान्यात भेट देवून डॉक्टर व नातेवाईकांसोबत चर्चा करून आर्थिक मदत केली.असून वनविभागाकडुन आर्थिक मदत त्वरित मिळवून देण्यासाठी सहकार्य करू असे सांगितले. यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री. भास्कर तलांडे, माजी जि. प. सदस्य श्री. अजय नैताम, वनरक्षक श्री. आर. सोयाम, श्रीनिवास राऊत, कार्तिक तोगम, सतीश चौधरी व नातेवईक उपस्थित होते.