खा. श्री. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाखाली स्वामी विवेकानंद कॉन्व्हेंट व्याहाड खुर्द येथे रक्तदान शिबिर

39

विदर्भ क्रांती न्यूज

सावली : भारतीय जनता पार्टी तालुका सावलीच्या वतीने देशाचे लाडके पंतप्रधान मान.नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवडा सेवा सप्ताह कार्यक्रम निमित्ताने स्वामी विवेकानंद कॉन्व्हेंट व्याहाड खुर्द येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना व युवकांना मार्गदर्शन करतांना या देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी वचनबद्ध आहे. देशातील गोर-गरीब, शोषित व वंचित वर्गाच्या कल्याणाकरिता देशसेवेचे ध्येय साध्य करत विविध जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी समर्पित भावनेने कार्यरत असतात, असे प्रतिपादन याप्रसंगी खा. अशोकजी नेते गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा यांनी केले.

या कार्यक्रमाप्रसंगी तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे अविनाश पाल, महामंत्री सतीश बोमावार, कोषाध्यक्ष अर्जुन भोयर, माजी बांध. सभापती संतोषभाऊ तंगडपलीवार, माजी.जि. प. सदस्या योगिताताई डबले, माजी पं. स. गणपतजी कोठारे, ज्येष्ठ नेते प्रकाश पा. गड्डमवार, कुनघाडकर,ओबीसी तालुका अध्यक्ष कवींद्रजी रोहनकर, माजी.सभापती कृष्णाभाऊ राऊत, मोहन चन्नावार, मोतीराम चिमुरकर, युवा नेते किशोर वाकुडकर, निखिलजी सुरमवार, नामदेव भोयर, जितू सोनटक्के, मुकेश बिके, दिवाकर गेडाम, तुळशीदास भुरसे, प्रदीप कुकुडकर, मनोहर कांबळे, विकास कोहळे, किरण सुरजागडे, रमेश नापे, लोकनाथ रायपुरे, रोशन गुरुनुले, लखन नापे, तसेच अनेक भाजपाचे पदाधिकारी व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

युवकांनी उत्स्फूर्तपणे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन स्वयंस्फूर्तीने, उत्साहाने, आनंदाने युवकांनी रक्तदान केले.