भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकारी, कार्यकर्ता बैठक संपन्न

129

– देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवडा सेवा सप्ताह कार्यक्रम

–खा. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्हा गडचिरोली शासकीय विश्रामगृह येथे मान. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवाडा सेवा सप्ताह कार्यक्रम घेण्यासाठी व कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी तसेच नियोजन करण्याकरिता या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

या बैठकीच्या कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी युवकांना मार्गदर्शन करताना या
देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी वचनबद्ध आहे. मा. मोदींंजी अंत्योदयाचा संकल्प देत देशातील गोर-गरीब, शोषित व वंचित वर्गाच्या कल्याणाकरिता देशसेवेचे ध्येय साध्य करत विविध जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी समर्पित भावनेने कार्यरत असतात, असे प्रतिपादन याप्रसंगी खा. अशोकजी नेते यांनी केले.

याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा यांनी रक्तदान शिबिर व वृक्षारोपण हा कार्यक्रम करण्याचे ठरविले. या कार्यक्रमाप्रसंगी खा. अशोकजी नेते गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, आम. डॉ. देवरावजी होळी, आम. मा. कृष्णाजी गजबे, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, प्रदेश सरचिटणीस एस.टि मोर्चाचे प्रकाशजी गेडाम, जिल्हा संघटक प्रभारी अनिलजी डोंगरे, प्रदेश सदस्य स्वप्निलजी वरघंटे, जिल्हाध्यक्ष युवा मोर्चाचे चांगदेवजी फाये, पंकजभाऊ खरवडे ता.अध्यक्ष युवा मोर्चा आरमोरी, पवनजी नारनवरे नगराध्यक्ष आरमोरी, अनिल कुनघाडकर, मुक्तेश्वर काटवे, विवेक बैस, अनिल तिडके, भाजयुमो जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, आशिष कोडाप, प्रिती शंभरकर, सारंग साळवे, उल्हास देशमुख, प्रशांत हटवार, शोयब पठाण, तसेच अनेक युवा वर्ग कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.