येत्या २० सप्टेंबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रोजगार मेळाव्याचे भव्य आयोजन

48

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांच्या सहकार्याने येत्या २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सीओई इमारतीत पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आलेले आहे. सदर मेळावा सर्व आय. टी. आय. उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी, इयत्ता बारावी MCVC उत्तीर्ण व पॉलिटेक्निक उत्तीर्ण माजी विद्यार्थ्यांंसाठी असून सर्व व्यवसायाच्या उमेदवारांना यात सहभागी होता येईल. या मेळाव्यात महाराष्ट्रातील विविध नामांकित कंपन्याचे प्रतिनिधी भरती मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. करिता इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे. तसेच अधिक माहितीसाठी टीसीपीसी विभागाचे प्रमुख आनंद मधुपवार (8087258852) यांच्याशी संपर्क साधावा. या भव्य रोजगार मेळाव्याचा सुशिक्षित बेरोजगार युवकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके यांनी केले आहे.