विदर्भस्तरीय सेस्टोबॉल स्पर्धेत विदर्भातील ३०० खेळाडू सहभागी

137

– कुरखेडा शहरातील मुनघाटे महाविद्यालय स्पर्धेचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सेस्टोबाॅल एसोसिएशन ऑफ गडचिरोली व श्री मुनघाटे महाविद्यालय कुुरखेडा यांचा संयुक्त विद्यमाने विदर्भस्तरीय ज्युनियर/सिनियर मुले, मुलींच्या सेस्टोबाॅल स्पर्धेला आजपासून कुुरखेडा शहरातील मुुनघाटे महाविद्यालयातील इनडोर स्टेडियममध्ये सुरुवात करण्यात आली. स्पर्धेत विदर्भातील विविध जिल्ह्यातील ३०० खेळाडू सहभागी झाले आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अभय आष्टेकर यांचा हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी गोंविदराव मुनघाटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे होते तर प्रमूख अतिथी म्हणून सेस्टोबाॅल असोसिएशन गडचिरोलीचे अध्यक्ष चांगदेव फाये, नगरपंचायत पाणी पुरवठा सभापती ऍड. उमेश वालदे, माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, उपप्राचार्य प्रा. किशोर खोपे, नगरसेविका दुर्गा गोटेफोडे, नगरसेविका अलका गिरडकर, पत्रकार सिराज पठाण, सामाजिक कार्यकर्ते उल्हास देशमुख, सेस्टोबाॅल एसोसिएशन चंन्द्रपूरचे मिलींद चौधरी, नागपूरचे लकी चौधरी, गोंदियाचे प्रितम दमाहे, अकोलाचे विवेक भागवत यवतमाळचे सूधाकर राठोड आदी उपस्थित होते. स्पर्धेत नागपूर, चन्द्रपूर, गोंदिया, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, नागपूर ग्रामीण व चन्द्रपूर ग्रामीणची चमू सहभागी आहेत. शहर वासीयाकरिता हा खेळ प्रकार नविन असला तरी याचा आनंद घेण्याकरिता मोठ्या संख्येत शहरवासीय व विद्यार्थी उपस्थित होते. अतिशय रोमांचक व उत्कंठा वर्धक लढती येथे बघावयास मिळत आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेस्टोबाॅल एसोसिएशनचे विदर्भ सचिव विजय पवार संचालन गडचिरोली जिल्हा सचिव हरिष बावनथडे तर आभार प्रदर्शन प्रितम दमाहे यांंनी केले.